चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये शनिवारी शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली.
कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो आणि कोबी यांसारख्या मालाची मोठी आवक असूनही पालेभाज्यांच्या भावात तेजी कायम राहिली. बाजारातील एकूण उलाढाल तब्बल ५ कोटी २२ लाख रुपये झाली.
कांद्याची आवक १,५०० क्विंटल झाली असून, आवक स्थिर राहिली असली, तरी भावात १०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव १,५०० रुपयांवरून १,४०० रुपयांवर आला.
तर, बटाट्याची आवक १,२५० क्विंटल झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक ७५० क्विंटलने घटली. तरीही भावात १०० रुपयांची वाढ होऊन कमाल भाव २,००० रुपयांवरून २,१०० रुपये झाला.
लसणाची आवक ३० क्विंटल झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० क्विंटलने वाढ झाली आहे. त्यामुळे लसणाचा कमाल भाव ८ हजार रुपयांवर पोहोचला. हिरवी मिरची ३२२ क्विंटल आली असून, तिला २,५०० ते ३,५०० रुपये दरम्यान दर मिळाला.
अधिक वाचा: १० वर्षांपासून डाळिंबाची युरोपला निर्यात; बिदालचा 'हा' शेतकरी एका हंगामात घेतोय ९५ लाखांचे उत्पन्न
