चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची आवक वाढली असून, टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवरच्या भावात वाढ झाली आहे.
मात्र, पालेभाज्यांच्या भरपूर आवकमुळे त्यांचे भाव घसरले. भुईमूग शेंगा आणि जळगाव भुईमूग शेंगांची आवक पूर्णपणे थांबली आहे, तर लसूण आणि हिरव्या मिरचीची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल ३ कोटी २० लाख रुपये झाली.
कांदा आणि बटाट्याची आवक वाढली
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढली असली, तरी कमाल भाव १,७०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला. कांद्याचे मध्यम भाव १,३०० रुपये आणि किमान भाव १,००० रुपये प्रति क्विंटल नोंदवले गेले.
बटाट्याच्या भावात १०० रुपयांची घसरण
बटाट्याची आवक १,४०० क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत ३०० क्विंटलने जास्त आहे. यामुळे बटाट्याच्या कमाल भावात १०० रुपयांची घसरण झाली असून, तो १,९०० वरून १,८०० रुपये प्रति क्विंटलवर आला. मध्यम भाव १,५०० रुपये, तर किमान भाव १,२०० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला.
अधिक वाचा: E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?