घोडेगाव : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात बुधवारी (दि.१९) झालेल्या लिलावात एक अर्ध्या वक्कलसाठी २२०० रुपये, तर सरासरी चांगल्या कांद्याला १५०० ते १७०० रुपये, हलक्या कांद्याला सरासरी ११०० ते १४०० रुपये भाव मिळाला.
घोडेगाव उपआवारात मागील आठवड्याच्या तुलनेने कांद्याची आवक घटली असून, नवीन लाल कांद्याची आवक वाढली आहे. बुधवारी बाजार समितीत एकूण ४६ हजार ६६५ कांदा गोण्यांची आवक झाली होती.
त्यात मोठा कांदा २००० ते २२००, मुक्कल भारी १५०० ते १८००, गोल्टी १००० ते १२००, गोल्टा १२०० ते १५००, तर जोड व कमी कलरच्या कांद्याला १०० ते ५०० रुपये, असा भाव मिळाल्याचे कांदा आडतदार गणेश ईखे यांनी सांगितले.
जुन्या मालाला दरवाढ
पुढील काही दिवसांत चांगला नवीन लाल कांदा बाजारात आल्यास, जुन्या कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, नवीन लाल कांदा खराब आल्यास जुन्या चांगल्या मालाला दरवाढ होऊ शकते, असे कांदा आडतदार रवींद्र राशीनकर म्हणाले.
अधिक वाचा: जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय
