Join us

Kanda Bajar Bhav : राज्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 18:01 IST

राज्याच्या विविध बाजारात आज गुरुवार (दि.२३) ऑक्टोबर 'भाऊबीज'च्या दिवशी' एकूण ६२१८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २० क्विंटल लोकल, १४६० क्विंटल नं.१, १२२० क्विंटल नं.२, १४०८ क्विंटल नं.३, २ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. (Kanda Bajar Bhav)

राज्याच्या विविध बाजारात आज गुरुवार (दि.२३) ऑक्टोबर 'भाऊबीज'च्या दिवशी' एकूण ६२१८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २० क्विंटल लोकल, १४६० क्विंटल नं.१, १२२० क्विंटल नं.२, १४०८ क्विंटल नं.३, २ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

 आज सर्वाधिक कांद्याची आवक शेवगाव बाजारात बघावयास मिळाली. ज्यात नं.१ वाणाच्या कांद्याला शेवगाव येथे कमीत कमी ९०० तर सरासरी ११५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच शेवगाव बाजारात नं.२ वाणाच्या कांद्याला कमीत कमी ६०० तर सरासरी ७५० यासह नं.३ वाणाच्या कांद्याला कमीत कमी २०० तर सरासरी ३५० रुपयांचा दर मिळाला. 

लोकल वाणाच्या कांद्याला आज वाई-सातारा येथे कमीत कमी १००० तर सरासरी १३०० रुपयांचा दर मिळाला. तसेच पुणे-पिंपरी येथे १३००, कामठी येथे १५०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आज केवळ २ क्विंटल आवक झाली होती. ज्यास भुसावळ बाजारात १००० रुपयांचा दर मिळाला. तसेच कोल्हापूर येथे आज कांद्याला कमीत कमी ४०० तर सरासरी ८०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला.    

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/10/2025
कोल्हापूर---क्विंटल13984001600800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल710140025001700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5120014001300
वाईलोकलक्विंटल9100016001300
कामठीलोकलक्विंटल6100020001500
शेवगावनं. १क्विंटल146090014001150
शेवगावनं. २क्विंटल1220600800750
शेवगावनं. ३क्विंटल1408200500350
भुसावळउन्हाळीक्विंटल2100010001000

हेही वाचा : नोकरीला नाकारत विठ्ठलरावांनी धरली शेतीची वाट; भाजीपाला शेतीतून ३ एकरांत कमावले उत्पन्न २८ लाख

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market Prices Fall Amidst Reduced Supply in Maharashtra

Web Summary : On Thursday, Maharashtra onion markets saw 6218 quintals arrival. Shevgaon had the highest arrival. Prices varied: Local onions reached ₹1300/quintal in Wai, while summer onions hit ₹1000/quintal in Bhusawal. Kolhapur saw ₹800/quintal average.
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनाशिकपुणेअहिल्यानगर