चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची विक्रमी आवक नोंदवली गेली.
हिरव्या मिरचीच्या आवक आणि भावातही उच्चांकी वाढ झाली. पालेभाज्यांची भरघोस आवक असूनही भाज्यांचे भाव तेजीत राहिले.
मात्र, भुईमूग शेंगा आणि जळगाव भुईमूग शेंगांची आतक पूर्णपणे ठप्प राहिली. लसणाची आवक आणि भाव स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल ४ कोटी ९० लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल नोंदवली गेली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४०० क्विंटलने अधिक आहे. यामुळे कांद्याचा कमाल भाव १,६०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावला.
बटाट्याची आवक १,५५० क्विंटल झाली, जी गेल्या आठवडचाच्या तुलनेत ५० क्विंटलने अधिक आहे. मात्र, भावात १०० रुपयांची घसरण होऊन कमाल भाव २,१०० वरून २,००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावला. इतर भाव १,३०० आणि १,१०० रुपये राहिले.
लसणाची स्थिरता, हिरव्या मिरचीची उसळी
लसणाची आवक ३० क्विंटल राहिली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. लसणाचा कमाल भाव १०,००० रुपये प्रतिक्विंटलवर कायम राहिला. हिरव्या मिरचीची आवक ३४० क्विंटल नोंदवली गेली, आणि भाव ६,००० ते ७,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले.
अधिक वाचा: पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचे 'पॅकेज' ठरले; पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार?