Join us

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:12 IST

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात किंचित वाढ झाली आहे. मंगळवारी १० किलो कांदा १८१ रुपये या भावाने विकला गेला आहे.

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात किंचित वाढ झाली आहे. मंगळवारी १० किलो कांदा १८१ रुपये या भावाने विकला गेला आहे, अशी माहिती सभापती निलेश स्वामी थोरात यांनी दिली.

सध्या दमदार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम शेतीच्या कामावर झाला आहे. कांदा काढणी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी बहुतेक कांदा बराकीमध्ये साठवून ठेवला आहे.

मात्र कांदा साठवून ठेवण्याची व्यवस्था नसलेले शेतकरी तो विक्रीसाठी आणू लागले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ हजार ३६५ पिशवी कांद्याची आवक झाली.

कांद्याचे प्रती १० किलोंचे दर पुढीलप्रमाणेसुपर लॉट १ नंबर गोळा कांदा १७० ते १८१ रुपये.सुपर गोळे कांदे १ नंबर १५० ते १६५ रुपये.सुपर मीडियम २ नंबर कांद्यास १३५ ते १२५ रुपये.गोल्टी कांद्यास ११५ ते १२५ रुपये.बदला कांद्यास ५० ते १०० रुपये.

असा बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली. कांद्याचे बाजारभाव किंचित वाढले असले तरी शेतकरी चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत असल्याचे व्यापारी संतोष पिंगळे यांनी सांगितले.

अधिक वाचा: राज्यात तब्बल ३७ हजार हेक्टरवरील पिकांची झाली माती; आजपासून पंचनाम्यांना सुरुवात

टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डमंचरशेतकरीपाऊस