Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : घोडेगाव बाजार समितीत गोल्टी कांद्याला कसा मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : घोडेगाव बाजार समितीत गोल्टी कांद्याला कसा मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : How is Golti onion getting price in Ghodegaon market comittee | Kanda Bajar Bhav : घोडेगाव बाजार समितीत गोल्टी कांद्याला कसा मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : घोडेगाव बाजार समितीत गोल्टी कांद्याला कसा मिळतोय दर

नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात कांद्याच्या भावात घसरण झाली असून पाचशे रुपयांनी भाव उतरले आहेत. बुधवारी कांद्याला सरासरी ४००० ते ४२०० रुपये भाव मिळाला.

नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात कांद्याच्या भावात घसरण झाली असून पाचशे रुपयांनी भाव उतरले आहेत. बुधवारी कांद्याला सरासरी ४००० ते ४२०० रुपये भाव मिळाला.

घोडेगाव : नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात कांद्याच्या भावात घसरण झाली असून पाचशे रुपयांनी भाव उतरले आहेत. बुधवारी कांद्याला सरासरी ४००० ते ४२०० रुपये भाव मिळाला.

उपबाजारात बुधवारी २५ हजार ६९३ कांदा गोण्यांची आवक झाली होती. मागील आठवड्यात काद्याला ५ हजार २०० रुपये भाव मिळाला होता.

आज त्याच कांद्याचा पाचशे ते सातशे रुपयांनी कमी भाव मिळाला. एक नंबर कांद्यास चार हजार पाचशे, तर मध्यम कांद्यास चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला.

गोल्टी कांद्यास तीन हजार सातशे ते चार हजार तर जोड तसेच हलक्या कांद्यास दीड हजार रुपये ते अडीच हजाराचा भाव मिळाला. काही मोजक्या कांदा गोण्यांस ४७०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला.

केंद्र शासनाने निर्यात शुल्क कमी केल्यानंतर भावामध्ये वाढ झाली होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा बाहेरील देशात पाठविता येत नसल्याने अनेक कंटेनर सीमेवर थांबून असल्यामुळे कांदा खरेदीदार ग्राहक कमी झाल्याने त्याचा परिणाम भावावर झाला. - अशोक येळवंडे, कांदा आडतदार, घोडेगाव

Web Title: Kanda Bajar Bhav : How is Golti onion getting price in Ghodegaon market comittee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.