ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे रविवार बाजारनिमित्त कांद्याची १०,३६५ पिशवींची आवक झाली.
अशी माहिती जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे व उप सभापती प्रीतम काळे व ओतूर उपबाजार समितीचे कार्यालय प्रमुख प्रदीप मस्करे यांनी दिली आहे.
रविवारी (दि. २९) ओतूर उपबाजारात काही महिन्यांपासून बाजारभावात चढउतार पाहायला मिळाला. त्यामुळे सध्या सरासरी १४ ते १७ रुपये भाव कांद्याला असल्याने येत्या गुरुवारी कांदा बाजार समितीत आणावा की नको, असा संभ्रम पाहायला मिळाला.
कभी खुशी कभी गम, असे शेतकऱ्याचे झाले आहे. दोन महिन्यांत कांद्याचे अजून बाजार भाव वाढतील, अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती. पण, कधी स्थिर तर कधी चढते, तर कधी उतरते बाजारभावामुळे शेतकरी विचलित होत आहे.
कांदे सध्या असलेल्या दमट हवामानामुळे खराब होत आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. पुढे बाजारभाव होतील आणि कांद्याचे २ पैसे होतील, अशी आशा शेतकऱ्याला आहे.
कसा मिळाला दर? (१० किलो प्रमाणे)
गोळा कांदा - १७० ते २०१
सुपर कांदा - १२० ते १८०
नंबर २ गोल्टी/गोल्टा कांदा - ३० ते १३०
कांदा बदला - २० ते १००
अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?