Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kadna Bajar Bhav : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळाला दर?

Kadna Bajar Bhav : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळाला दर?

Kadna Bajar Bhav : Onion price increase in Parner Agricultural Produce Market Committee; How did the price get determined? | Kadna Bajar Bhav : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळाला दर?

Kadna Bajar Bhav : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळाला दर?

पावसामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे साठवणीची व्यवस्था नाही त्यांनी कांदा विक्रीला काढला आहे.

पावसामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे साठवणीची व्यवस्था नाही त्यांनी कांदा विक्रीला काढला आहे.

पारनेर: पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या ७२ गोण्यांना २२ रुपये किलो भाव मिळाला असल्याची माहिती सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी दिली.

पावसामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे साठवणीची व्यवस्था नाही त्यांनी कांदा विक्रीला काढला आहे.

रविवारी समितीत ७ हजार ८७८ गोण्यांची आवक झाली होती. एकीकडे नुकसान तर दुसरीकडे कांदा भावात किंचितशी वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला आहे.

कसे मिळाले भाव?
१ नंबर वक्कलला प्रतिक्विंटल १७०० ते १८०० रुपये.
२ नंबरला १४०० ते १६०० रुपये.
३ नंबरला ९०० ते १३०० रुपये.
४ नंबरला २०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे.

तर गोल्टीला १ हजार ते १४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला असल्याचे माजी सभापती बाबासाहेब तरटे व उपसभापती किसनराव सुपेकर यांनी सांगितले.

भिजलेला कांदा विक्रीसाठी आणू नये
पावसाने पारनेर तालुक्यातील भुई आरणी असलेल्या कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीत भिजलेला कांदा विक्रीसाठी आणू नये याचा परिणाम हा चांगल्या मालावर होत आहे. असे आवाहन व्यापारी संघटनेच्यावतीने मारुती रेपाळे व संचालक चेतन भळगट, नंदकुमार देशमुख, किसनदादा गंधाडे, राजेंद्र तायडे यांनी केले आहे. सध्या अनेक ठिकाणी कांदा अवकाळी पावसाने भिजला आहे.

अधिक वाचा: मान्सून पुन्हा सक्रिय होणार; १३ जूनपासून राज्यात या ठिकाणी पुन्हा धो-धो बरसणार

Web Title: Kadna Bajar Bhav : Onion price increase in Parner Agricultural Produce Market Committee; How did the price get determined?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.