Lokmat Agro >बाजारहाट > Jwari Bajar Bhav : उन्हाळ्यात ज्वारी मागणीत होतेय वाढ; दर ४ हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

Jwari Bajar Bhav : उन्हाळ्यात ज्वारी मागणीत होतेय वाढ; दर ४ हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

Jwari Bajar Bhav : Sorghum demand increases during summer; Chances of crossing the rate 4 thousand rupees per quintal | Jwari Bajar Bhav : उन्हाळ्यात ज्वारी मागणीत होतेय वाढ; दर ४ हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

Jwari Bajar Bhav : उन्हाळ्यात ज्वारी मागणीत होतेय वाढ; दर ४ हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

ज्वारीच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे दिवसेंदिवस ज्वारीला मागणी वाढत आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल २ हजार ते ३३०० रुपये दर मिळत आहे.

ज्वारीच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे दिवसेंदिवस ज्वारीला मागणी वाढत आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल २ हजार ते ३३०० रुपये दर मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

प्रशांत ननवरे
बारामती : ज्वारीमध्ये असलेले पोषक घटक आणि त्याचे औषधी गुणधर्म यामुळे ज्वारी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

ज्वारीच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे दिवसेंदिवस ज्वारीला मागणी वाढत आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल २ हजार ते ३३०० रुपये दर मिळत आहे.

येत्या काही दिवसांत हा दर ४ हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीला यंदा अच्छे दिन येणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.

ज्वारीमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. यातील प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी महत्त्वाची असतात.

ज्वारीमध्ये असलेले पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. ज्वारीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.

एकूणच आरोग्यदायी असणाऱ्या ज्वारी पिकामुळे चपातीची जागा आता भाकरीने घेतली आहे. भाकरी आता श्रीमंतांचे अन्न बनू पाहत आहे. याबाबत बारामती येथील आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नीलेश महाजन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, मुळातच गहू पचायला जड आहे. 

मार्च ते एप्रिल महिना ज्वारीला मागणी
सध्या ज्वारीला २००० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. ज्वारीचे दर तेजीत आहेत. दि. १५ मार्च ते पूर्ण एप्रिल महिना ज्वारीला बाजारात मागणी असते. त्यामुळे बाजारात ज्वारीचा दर ४ हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता फराटे यांनी व्यक्त केली आहे.

रब्बी ज्वारीची पेरणी दि. १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान केली जाते. हे पीक जनावरांच्या चाऱ्यासाठीदेखील वापरतात. या भागात मालदांडी ज्वारीचे प्रमाण अधिक आहे. एकूण लागवड कालावधी साडेतीन महिन्यांचा असतो. कमी पाण्यावर येणारे कोरडवाहू, कमी वेळात येणारे हे पीक आहे. त्यामुळे बागायती आणि जिरायती भागात या पिकाची लागवड केली जाते. या पिकासाठी मशागत, लागवडीचा खर्चही कमी आहे. शक्यतो या पिकाला रोगराई नाही; फवारणी खर्च शून्य असते. सर्वच शेतकरी या पिकाची लागवड करतात. त्यामुळे या पीक काढणीसाठी मजूर टंचाई असते. - दौलत सांगळे, शेतकरी, बिरंगुडी

अधिक वाचा: सोलापूर बाजार समितीत मागील आठवड्यात ३०० ट्रक कांद्याची आवक; कसा मिळाला सरासरी दर?

Web Title: Jwari Bajar Bhav : Sorghum demand increases during summer; Chances of crossing the rate 4 thousand rupees per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.