Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > साखरेपेक्षा गूळ महाग, लाल मिरचीसह गरम मसाला तेजीत; ज्वारी, तूर, सोयाबीन, खाद्यतेलासह शेंगदाण्यामध्ये मात्र मंदी

साखरेपेक्षा गूळ महाग, लाल मिरचीसह गरम मसाला तेजीत; ज्वारी, तूर, सोयाबीन, खाद्यतेलासह शेंगदाण्यामध्ये मात्र मंदी

Jaggery is more expensive than sugar, red chilli and garam masala are on the rise; however, there is a slowdown in the prices of jowar, tur, soybean, edible oil and groundnuts. | साखरेपेक्षा गूळ महाग, लाल मिरचीसह गरम मसाला तेजीत; ज्वारी, तूर, सोयाबीन, खाद्यतेलासह शेंगदाण्यामध्ये मात्र मंदी

साखरेपेक्षा गूळ महाग, लाल मिरचीसह गरम मसाला तेजीत; ज्वारी, तूर, सोयाबीन, खाद्यतेलासह शेंगदाण्यामध्ये मात्र मंदी

बाजारपेठेत गूळ, मका, लाल मिरची आणि गरम मसाल्यांमध्ये तेजी दिसून येत आहे. त्याचबरोबर सोन्या चांदीमधील तेजी कायम आहे. मात्र ज्वारी, तूर, सोयाबीन, खाद्यतेलासह शेंगदाण्यामध्ये मात्र मंदीचे चित्र आहे.

बाजारपेठेत गूळ, मका, लाल मिरची आणि गरम मसाल्यांमध्ये तेजी दिसून येत आहे. त्याचबरोबर सोन्या चांदीमधील तेजी कायम आहे. मात्र ज्वारी, तूर, सोयाबीन, खाद्यतेलासह शेंगदाण्यामध्ये मात्र मंदीचे चित्र आहे.

संजय लव्हाडे 

सध्या जालना बाजारपेठेत गिऱ्हाईकी कमी आहे. बाजारपेठेत गूळ, मका, लाल मिरची आणि गरम मसाल्यांमध्ये तेजी दिसून येत आहे. त्याचबरोबर सोन्या चांदीमधील तेजी कायम आहे. ज्वारी, तूर, सोयाबीन, खाद्यतेलासह शेंगदाण्यामध्ये मात्र मंदीचे चित्र आहे. यावर्षी गुळाची गुऱ्हाळे कमी झाल्याने गुळामध्ये तेजी आली असून, दर ३८०० रुपयांपासून ४३५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.

दुसरीकडे साखरेचे ठोक भाव सरासरी ४००० ते ४२०० रुपये प्रति क्विंटल  आहेत. गुळाची आवक साधारण असल्याने गुळाचे भाव तेजीत आहेत. त्यातच गुळाची पावडर करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गुळ पावडरची अधिक विक्री संपूर्ण महाराष्ट्रात होते. मद्यनिर्मितीमध्ये गुळ पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

राज्यातील गहू बाजारात शनिवारी संमिश्र चित्र पाहायला मिळाले. काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या दरात वाढ झाली असली, तरी अनेक ठिकाणी आवक वाढल्यामुळे दरांवर दबाव कायम असल्याचे दिसून आले. सध्या राज्यातील गहू बाजारात गुणवत्तेनुसार दरात मोठी तफावत जाणवत आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक अधिक आहे, त्याठिकाणी दर तुलनेने कमी आहेत.

लाल मिरची व मसाल्यांच्या दरात वाढ

लाल मिरची व मसाल्यांच्या दरात वाढ झाली असून, ही दरवाढ प्रति किलो ५० ते १०० रुपयांपर्यंत आहे. सध्या बाजारात मिरचीची आवक कमी असल्याने दर २०० ते ५०० रुपये प्रति किलोच्या घरात जाऊन पोहोचले आहेत. गेल्यावर्षी मिरचीचे दर सरासरी २०० ते ३५० रुपये किलोदरम्यान होते. यावर्षी या दरात सुमारे १० ते २० टक्क्यांची वाढ झाली. सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून मिरचीची आवक सुरू आहे.

असे आहेत पिकनिहाय बाजारभाव (प्रतिक्विंटल)

प्रकार भाव
गहू २००० ते ५००० 
ज्वारी२४०० ते ४७०० 
बाजरी२००० ते २७०० 
सोयाबीन४९५० ते ५५५० 
साखर४००० ते ४२०० 
पामतेल१५५०० 
सूर्यफूल तेल१७९०० 
सरकी तेल१६००० 
सोयाबीन तेल१६२०० 
करडई तेल२४५०० 

हेही वाचा : पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड; विक्रमी उत्पादन घेत फायद्याची शेती करणारे सुधारकराव

Web Title : गुड़, चीनी से महंगा; मिर्च-मसाले तेज, अनाज में मंदी।

Web Summary : जालना बाजार में गुड़, मिर्च, मसाले महंगे। गुड़ की मांग बढ़ी, आपूर्ति कम, चीनी से ज़्यादा दाम। गेहूँ में मिला-जुला रुख। कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र से कम आपूर्ति से मिर्च के दाम बढ़े, अनाज सस्ता।

Web Title : Jaggery prices soar past sugar; Chili, spices up; grains down.

Web Summary : Jalna market sees jaggery, chili, spice price rise. Jaggery demand up, supply low, exceeding sugar price. Wheat mixed. Chili prices surge due to reduced supply from Karnataka, Andhra Pradesh, Maharashtra. Grain prices dip.