Lokmat Agro >बाजारहाट > भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात

भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात

Indian fruits have increased in importance in the global market; Exports of 43 lakh 35 thousand tonnes of fruits | भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात

भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात

Indian Fruit Market विशिष्ठ हंगामातच फळे खावीत ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. आता वर्षभर फळे खाल्ली जातात. त्यामुळे त्यांची मागणी वाढते. कोरोनानंतर जगभर आहारातील फळांचा समावेश वाढला.

Indian Fruit Market विशिष्ठ हंगामातच फळे खावीत ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. आता वर्षभर फळे खाल्ली जातात. त्यामुळे त्यांची मागणी वाढते. कोरोनानंतर जगभर आहारातील फळांचा समावेश वाढला.

शेअर :

Join us
Join usNext

आरोग्यासाठी फळे खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे लक्षात आल्यामुळे मुंबईकरांच्या आहारात फळे हा अविभाज्य भाग बनू लागली आहेत.

विशिष्ठ हंगामातच फळे खावीत ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. आता वर्षभर फळे खाल्ली जातात. त्यामुळे त्यांची मागणी वाढते. कोरोनानंतर जगभर आहारातील फळांचा समावेश वाढला.

त्यामुळे वर्षभर त्यांचा पुरवठा करण्यासाठी जागतिक देवाण-घेवाणही होत आहे. परिणामी, भारतातील फळ निर्यात व्यापार १३ ते १४ हजार कोटी रुपयांवर, तर आयात व्यापार ९ ते १० हजार कोटींपर्यंत वाढला आहे.

उन्हाळी फळांचा हंगाम संपला आहे. आंब्याची जागा आता हिमाचल प्रदेशच्या सफरचंदासह पपई आणि इतर फळांनी घेतली आहे.

देशाच्या विविध भागांतून रोज दीड ते दोन हजार टन फळे मुंबईबाजार समितीमध्ये येत आहेत. पावसाळ्यात परदेशी फळांनाही मोठी मागणी असते. यामुळे प्रत्येक मार्केटमध्ये परदेशी फलेही भाव खातात.

पावसाळ्यात फळांची मागणी वाढते. कारण डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांच्या साथी पसरल्या की, डॉक्टर फळे खाण्याचा सल्ला देतात. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोरोना काळापासून फळांचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे.

पावसाळ्यात किवी, ड्रॅगनफ्रूट, पपईसह लिंबूवर्गीय फळांनाही चांगला भाव मिळतो. यामुळे फळविक्री दुकानांच्या संख्येतही वाढ होत आहे.

मुंबई बाजार समितीत सध्या सफरचंदाचेच वर्चस्व आहे. हिमाचल प्रदेशातून ३०० ते ४०० टन सफरचंद रोज येतात. तर साथीच्या आजारांच्या धोक्यामुळे दररोज २०० ते २५० टन पपईचीही विक्री होत आहे.

कलिंगड, अननस, नासपती, पेरू, पेर, सीताफळासह आयात होणारी किती, अ‍ॅव्होकॅडो, चेरी, संत्री, मोसंबी, ड्रॅगनफ्रुटची मागणी वाढली आहे.

जागतिक बाजारपेठेत भारतीय फळे
◼️ भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्व वाढू लागले आहे.
◼️ गतवर्षी तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळे निर्यात झाली. या व्यापारातून १३ हजार १८५ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
◼️ परदेशातून १२ लाख ६० हजार टन फळांची आयात झाली. त्यातून ९ हजार ६२७ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
◼️ फळांच्या जागतिक देवाण-घेवाणीमुळेच आता मुंबई, नवी मुंबईकर बाराही महीने फळांचा आस्वाद घेतात.

मुंबईकर खातात २ हजार टन फळे
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सरासरी २०० ते २५० वाहनांमधून २ हजार टन फळांची आवक होते. हिमाचलमधून सफरचंद, प्लम, पेरची आवक सुरु आहे. उत्तरेकडून आंब्यासह इतर फळांची आवक होते. महाराष्ट्रातून सीताफळ, पपई, डाळिंबे येतात.

आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यावर
फळांचा राजा आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. सध्या उत्तर प्रदेशमधून ८० ते १०० टन आंब्याची आवक होत आहे. लवकरच आंबा हंगाम संपेल. दिवाळीमध्ये मलावी हापूसच्या हंगामापासून पुन्हा आंबा हंगाम सुरू होईल.

- नामदेव मोरे
उपमुख्य उपसंपादक

अधिक वाचा: उसाच्या पट्ट्यात आले पिक बहरले; पाडेगावचे शेतकरी रमेश यांनी एकरात ११ लाख कमवले

Web Title: Indian fruits have increased in importance in the global market; Exports of 43 lakh 35 thousand tonnes of fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.