Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > युद्धविरामानंतर निर्यातीमध्ये मोठी वाढ; तांदूळ, गहू, ज्वारी, कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ

युद्धविरामानंतर निर्यातीमध्ये मोठी वाढ; तांदूळ, गहू, ज्वारी, कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ

Huge increase in exports after ceasefire; demand for rice, wheat, jowar, pulses and essential commodities increases | युद्धविरामानंतर निर्यातीमध्ये मोठी वाढ; तांदूळ, गहू, ज्वारी, कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ

युद्धविरामानंतर निर्यातीमध्ये मोठी वाढ; तांदूळ, गहू, ज्वारी, कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ

गहू, ज्वारी, तांदूळ व कडधान्य अशा जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ झाली असून, सध्या उठाव वाढल्याने बाजारपेठेत तेजीत आहे. मागणी वाढल्याने मालाची आवक आणि जावक या दोन्ही पातळ्यांवर मार्केटयार्डात लगबग वाढली आहे.

गहू, ज्वारी, तांदूळ व कडधान्य अशा जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ झाली असून, सध्या उठाव वाढल्याने बाजारपेठेत तेजीत आहे. मागणी वाढल्याने मालाची आवक आणि जावक या दोन्ही पातळ्यांवर मार्केटयार्डात लगबग वाढली आहे.

अजित घस्ते 

जागतिकस्तरावर काही भागांतील युद्धजन्य परिस्थिती निवळताच आणि निर्बंधांमध्ये शिथिलता येताच, पुणे मार्केटयार्डातून तांदळाच्या निर्यातीने वेग घेतला आहे. युद्धाच्या सावटाखाली मंदावलेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आता पुन्हा एकदा गजबजली असून, तांदळासोबतच गहू, ज्वारी इतर कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीतही मोठी मागणी वाढल्याचे चित्र सध्या मार्केटयार्ड भुसार बाजारात पाहायला मिळत आहे.

गहू, ज्वारी, तांदूळ व कडधान्य अशा जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ झाली असून, सध्या उठाव वाढल्याने बाजारपेठेत तेजीत आहे. मागणी वाढल्याने मालाची आवक आणि जावक या दोन्ही पातळ्यांवर मार्केटयार्डात लगबग वाढली आहे. मार्केटयार्डत लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मागणीसोबतच बाहेरच्या राज्यांतूनही मालाला चांगली पसंती मिळत आहे.

येथे होते निर्यात

बासमती तांदूळ निर्यातीमध्ये सौदी अरेबिया, इराक, इराण, येमेन, यूएई, तसेच युरोप व अमेरिकेमध्ये तांदळाला सर्वाधिक मागणी आहे. युद्धविराम मिळाल्यानंतर तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

बासमती तांदळाची परदेशात 'धूम'

• गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आता पूर्वपदावर येत आहे. जगभरात भारतीय बासमती तांदळाला मागणी अधिक असते. त्यामुळे आता विशेषतः बासमती आणि कोलम तांदळाच्या निर्यातीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

• युद्धजन्य परिस्थितीमुळे थांबलेली जहाजे आता मार्गस्थ होत असल्याने तांदूळ निर्यात मागणी वाढली असून, स्थानिक बाजारातही तांदळाला चांगली बाजारपेठ मिळत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

साठवणुकीसाठी लागणाऱ्या वस्तूमध्ये गहू, तांदूळ सर्वाधिक मागणी

उन्हाळ्यात सुटी पडल्याने बाजारात सध्या बाजारात १२ महिने साठवणुकीसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत गहू, तांदूळ, ज्वारी इतर कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

युद्धजन्य परिस्थिती विराम मिळाल्यानंतर तांदूळ निर्यात वाढली आहे. सध्या बासमती व बिगर बासमती तांदळाला चांगली मागणी आहे. सध्या मार्केट यार्ड बाजारात १२ महिने साठवणुकीसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूच्या मागणीत वाढ झाली असून खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र, नैसर्गिक आपत्ती व अवकाळी पावसामुळे उत्पादन क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे चांगल्या मालाची प्रत कमी आहे. - अभय संचेती, ज्येष्ठ व्यापारी मार्केट यार्ड.

असे आहेत मार्केट यार्ड भुसार बाजारातील सध्याचे दर

(बाजार भाव प्रतिक्विंटल रुपयांत)

  • पारंपरिक बासमती : १२,००० ते १४,००० 
  • ११२१ बासमती स्टीम : ११,००० ते १२,००० 
  • १४०१ बासमती स्टीम : ११,५०० ते १२,५०० 
  • सेला बासमती : ९,५०० ते १०,००० 
  • गहू लोकवन : ३५०० ते ४५०० 
  • गावरान ज्वारी : ५५०० ते ६५०० 
  • तूर डाळ : १२००० ते १५००० 
  • शेंगदाणे : १२५०० ते १४००० 
  • खाद्य तेल : २४५० ते २५०० (१५ किलो डब्बा).   

एप्रिलमध्ये नवीन माल बाजारात येत असतो. यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ बरोबर इतर कडधान्ये खरेदी केली जाते. त्यात उन्हाळ्यातील सण-समारंभ आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदीही वाढली आहे. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत आहे. - राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना चेंबर.

हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Huge increase in exports after ceasefire; demand for rice, wheat, jowar, pulses and essential commodities increases