Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात खरीप मक्याची भरघोस आवक; कुठे मिळतोय सर्वोच्च दर? वाचा आजचे बाजारभाव

राज्यात खरीप मक्याची भरघोस आवक; कुठे मिळतोय सर्वोच्च दर? वाचा आजचे बाजारभाव

Huge arrival of Kharif maize in the state; Where is the highest price being obtained? Read today's market price | राज्यात खरीप मक्याची भरघोस आवक; कुठे मिळतोय सर्वोच्च दर? वाचा आजचे बाजारभाव

राज्यात खरीप मक्याची भरघोस आवक; कुठे मिळतोय सर्वोच्च दर? वाचा आजचे बाजारभाव

Today Maize Market Rate : चालू हंगामातील नवीन मका बाजारात येण्यास सुरुवात झाली असून राज्याच्या विविध बाजार समित्यांमध्ये आज गुरुवार (दि. ११) रोजी एकूण १९२८ क्विंटल मका आवक झाली. यामध्ये २२५ क्विंटल हायब्रिड, १५७ क्विंटल लाल, ४७५ क्विंटल लोकल आणि ९७८ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता.

Today Maize Market Rate : चालू हंगामातील नवीन मका बाजारात येण्यास सुरुवात झाली असून राज्याच्या विविध बाजार समित्यांमध्ये आज गुरुवार (दि. ११) रोजी एकूण १९२८ क्विंटल मका आवक झाली. यामध्ये २२५ क्विंटल हायब्रिड, १५७ क्विंटल लाल, ४७५ क्विंटल लोकल आणि ९७८ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता.

शेअर :

Join us
Join usNext

चालू हंगामातील नवीन मकाबाजारात येण्यास सुरुवात झाली असून राज्याच्या विविध बाजार समित्यांमध्ये आज गुरुवार (दि. ११) रोजी एकूण १९२८ क्विंटल मका आवक झाली. यामध्ये २२५ क्विंटल हायब्रिड, १५७ क्विंटल लाल, ४७५ क्विंटल लोकल आणि ९७८ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता.

सर्वाधिक आवक असलेल्या चाळीसगाव बाजारात पिवळ्या वाणाच्या मकाला आज किमान १३‍०‍० रुपये, तर सरासरी २०७७ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच मालेगाव येथे १९६१, चोपडा येथे १६०२, मलकापूर येथे २०५५, तर कर्जत (राशिन) येथे २१०० रुपयांचा प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.

हायब्रिड मकाला आज सटाणा येथे किमान १३७८ रुपये तर सरासरी १४५१ रुपयांचा दर मिळाला. जालना येथे लाल मकाला किमान १४११ रुपये तर सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला. तसेच अमरावती येथे २१७५ रुपये तर पुणे येथे २६०० रुपयांचा प्रतिक्विंटल सरासरी दर लाल मकाला मिळाला.

सांगली आणि मुंबई बाजारात आवक झालेल्या लोकल वाणाच्या मकाला मुंबई येथे किमान २७०० रुपये तर सरासरी ३२०० रुपयांचा दर मिळाला. तसेच सांगली येथे किमान २४०० रुपये तर सरासरी २५०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, राज्यातील मका आवक व दर खालीलप्रमाणे

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/09/2025
नागपूर----क्विंटल3200022002150
पाचोरा----क्विंटल90190021002000
सटाणाहायब्रीडक्विंटल225137817001451
जालनालालक्विंटल154141122752250
अमरावतीलालक्विंटल1210022502175
पुणेलालक्विंटल2250027002600
सांगलीलोकलक्विंटल150240026002500
मुंबईलोकलक्विंटल325270035003200
अकोलापिवळीक्विंटल1165016501650
धुळेपिवळीक्विंटल37207120992071
मालेगावपिवळीक्विंटल350159122161961
चोपडापिवळीक्विंटल100140020991602
पैठणपिवळीक्विंटल2147514751475
चाळीसगावपिवळीक्विंटल400130022272077
मलकापूरपिवळीक्विंटल59195521302055
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल16200021502000
कर्जत- (राशिन)पिवळीक्विंटल13200022002100

Web Title: Huge arrival of Kharif maize in the state; Where is the highest price being obtained? Read today's market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.