Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याला राज्यात कांदा दराने किती घेतली उसळी? वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:21 IST

राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.१९) मार्च गुढी पाडव्याच्या दिवशी एकूण ४५३२९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४०७० क्विंटल लाल, ११७६४ क्विंटल लोकल, ५२० क्विंटल नं.१, ५२० क्विंटल नं.२, ३१६ क्विंटल नं.३, ८४०० क्विंटल पोळ, १४९८५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्याच्या कांदाबाजारात आज गुरुवार (दि.१९) मार्च गुढी पाडव्याच्या दिवशी एकूण ४५३२९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४०७० क्विंटल लाल, ११७६४ क्विंटल लोकल, ५२० क्विंटल नं.१, ५२० क्विंटल नं.२, ३१६ क्विंटल नं.३, ८४०० क्विंटल पोळ, १४९८५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणेबाजारात कमीत कमी ४०० तर सरासरी ८५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच सांगली-फळे भाजीपाला बाजारात १०००, पुणे-पिंपरी येथे १५००, पुणे-मोशी येथे ८००, वाई येथे ८००, मंगळवेढा येथे १००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या कोपरगाव बाजारात कमीत कमी ३०० तर सरासरी ७५० रुपयांचा दर मिळाला. तसेच भुसावळ येथे ८००, सिन्नर-नायगाव येथे १०००, लासलगाव-निफाड येथे ८५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. उन्हाळ कांद्याला जुन्नर -ओतूर येथे कमीत कमी ७०० तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. 

तसेच पिंपळगाव(ब) - सायखेडा येथे ९५०, पिंपळगाव बसवंत येथे १३०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. याशिवाय पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ३०० तर सरासरी ८२५ रुपयांचा सरासरी दर मिळाला. नं.१ कांद्याला शेवगाव येथे ९००, नं.२ कांद्याला शेवगाव येथे ६५० आणि नं.३ कांद्याला ३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

कोल्हापूर येथे कांद्याला कमीत कमी ५०० तर सरासरी ८००, राहुरी-वांबोरी येथे कमीत कमी १०० तर सरासरी ८०० रुपयांचा दर मिळाला. विशेष की, राज्याच्या अनेक बाजारात आज लिलाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे राज्यात आज कांदा आवक कमी दिसून आली. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/03/2026
कोल्हापूर---क्विंटल36805001400800
राहूरी -वांबोरी---क्विंटल10741001300800
लासलगाव - निफाडलालक्विंटल17105001000850
सिन्नर - नायगावलालक्विंटल12530014001000
कोपरगावलालक्विंटल2180300909750
भुसावळलालक्विंटल556001000800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल248950015001000
पुणेलोकलक्विंटल85524001300850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल6804001200800
वाईलोकलक्विंटल225001300800
मंगळवेढालोकलक्विंटल1380011501000
शेवगावनं. १क्विंटल5208001100900
शेवगावनं. २क्विंटल520500700650
शेवगावनं. ३क्विंटल316100400300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल84003001300825
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल1051570014001100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल350070015511300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल9706601151950

हेही वाचा : विजयरावांनी घेतले तीन एकरात हरभऱ्याचे ४१ क्विंटल उत्पादन; १.४५ लाखांचा मिळवला नफा

English
हिंदी सारांश
Web Title : Onion prices surge on Gudi Padwa in Maharashtra: Market rates

Web Summary : On Gudi Padwa, Maharashtra's onion market saw 45329 quintals arrival. Local onion fetched ₹850/quintal in Pune. Red onion reached ₹750/quintal in Kopargaon. The market saw reduced activity due to closed auctions in many areas.
टॅग्स :कांदानाशिकपुणेबाजारमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतकरीगुढीपाडवा