सोलापूर : सोलापूरबाजार समितीसह राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. व याशिवाय आंध्रप्रदेश, तेलंगणामध्ये नवीन कांदा उत्पादित होत आहे. त्यामुळे सोमवारी दरात मोठी घसरण झाली होती.
मागील आठवड्यात ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. सोमवारी २००० रुपये भाव मिळाला. दोन दिवसात १००० हजार रुपये कमी झाल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्यात तब्बल ५ हजारांपेक्षा जास्त ट्रक कांद्याची आवक झाली होती. उन्हाळी कांदा वाढत असल्याने दर पडण्याची भीती होती.
सोमवारी ३१६ ट्रक कांद्याची आवक होती. त्यामुळे अचानक दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
सोमवारी सरासरी १२०० रुपये दर मिळाला आहे. मागील आठवड्यात सरासरी दर १८०० ते २००० रुपयांपर्यंत होता. ६०० ते ८०० रुपये दर झाल्याचे दिसून येत आहे.
यंदा जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे पुढील महिनाभर कांद्याची आवक राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता दरात घसरण झाल्याने माल विलंबाने विक्रीसाठी आणतील, असा अंदाज आहे.
कांद्याची आवक वाढली आहे. त्यात आंध्रप्रदेशातूनही मागणी कमी झाली आहे. कारण, त्या ठिकाणी नवीन माल येत आहे. त्यामुळे पुढील १५ ते २० दिवस आवक कमीच राहणार आहे. - नामदेव शेजाळ, कांदा विभाग प्रमुख
अधिक वाचा: वाशी मार्केटमध्ये हापूससह बदामी लालबाग, तोतापुरीही दाखल; कोणत्या आंब्याला मिळतोय किती दर?