lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > पाडव्याला कोकणचा हापूसच राजा; ९१ हजार पेट्या आंब्याची आवक

पाडव्याला कोकणचा हापूसच राजा; ९१ हजार पेट्या आंब्याची आवक

Hapuscha king of Konkan to Padavya; | पाडव्याला कोकणचा हापूसच राजा; ९१ हजार पेट्या आंब्याची आवक

पाडव्याला कोकणचा हापूसच राजा; ९१ हजार पेट्या आंब्याची आवक

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगामामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यावर्षी पाडव्यादिवशी तब्बल ९१,७३० पेट्यांची आवक झाली असून, यामध्ये ७० टक्के आंबे कोकणातून विक्रीसाठी आले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगामामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यावर्षी पाडव्यादिवशी तब्बल ९१,७३० पेट्यांची आवक झाली असून, यामध्ये ७० टक्के आंबे कोकणातून विक्रीसाठी आले आहेत.

यावर्षी आंबा हंगाम लवकर सुरू झाला आहे. जानेवारी अखेरपासून बाजार समितीमध्ये आवक सुरू झाली. एप्रिलच्या सुरुवातीला प्रतिदिन ५० हजार पेट्यांचा टप्पा ओलांडला आहे. ८ एप्रिलला ९५ हजार २४० पेट्यांची आवक झाली होती.

गुढीपाडव्याच्या दिवशीही ५० ते ५५ हजार पेट्यांची आवक होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, कोकणातील व दक्षिणेकडून पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये रात्री दहा वाजल्यापासून आवक सुरू झाली.

या आंबा पेट्यांची विधिवत पूजा केल्यानंतर पेट्यांचा लिलाव करण्यात आला. सध्या १,५०० रुपये ते ३,००० रुपये असा पेटीचा दर आहे. यावर्षी पहिल्या टप्यातील आंबा कमी होता. दुसऱ्या टप्प्यातील आंबा तयार होऊन बाजारात आला आहे. मात्र हा आंबा दि. १० मेपर्यंतच असेल तिसऱ्या टप्प्यातील आंबा मात्र उशिरा होईल. पाऊस लागला तर पिकाचे नुकसान होईल

अन्य राज्यांतील आंबाही विक्रीसाठी
रत्नागिरी हापूस बरोबर अन्य राज्यांतील आंबाही विक्रीसाठी उपलब्ध आहे. तोतापुरी, बदामी, लालबाग, कर्नाटक हापूस विक्रीला असून, हा आंबा किलोवर विकण्यात येत आहे. तोतापुरी ४० ते ५० रुपये किलो, बदामी ७० ते १०० रुपये, लालबाग ७० ते ८० रुपये तर कर्नाटक ७० ते १२० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.

७० टक्के आंब्याची होते परदेशी निर्यात
वाशी बाजारामध्ये विक्रीसाठी येणारा ७० टक्के आंबा आखाती प्रदेश अमेरिका, युरोपमध्ये निर्यात होतो. उर्वरित ३० टक्के राज्याबाहेर व राज्यात विक्री होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत सध्या हजार ते १५०० रुपयांचा फरक पडत आहे.

खत व्यवस्थापन ते आंबा काढणीपर्यंत एका पेटीला किमान ३,००० ते ३,२०० रुपये खर्च येतो. दरवर्षी नैसर्गिक दृष्टचक्रामुळे आंबा पिकावर परिणाम होतो व आंबा पीक धोक्यात येते. गतवर्षी आंबाच कमी होता, त्यामुळे दर टिकून होते. यावर्षी आंबा आहे; पण दर कमी आहेत. त्यामुळे आंबा उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नाही. पेटीला किमान तीन हजार रुपये दर मिळावा. - राजन कदम, आंबा बागायतदार

अधिक वाचा: हापूसच्या फळांचे संरक्षण, आकार व वजन वाढविण्यासाठी करा हा एकदम सोपा स्वस्त उपाय

Web Title: Hapuscha king of Konkan to Padavya;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.