दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये गणेश ट्रेडिंग कंपनीमध्ये एक अडत कंपनी नामक त्याचा प्रो. प्रा. व्यापारी गणेश सुधाकर देशमुख म्हणून काम करत होता.
गेल्या हंगामामध्ये त्याने ४७ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास ३६ लाख रुपये थकवले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच्याकडे वारंवार पैसे मागितले, परंतु शेतकऱ्यांना सतत उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. असे करून या व्यापाऱ्याने जवळपास दोन ते तीन महिने शेतकऱ्यांना वंचित ठेवले.
त्यानंतर या शेतकऱ्यांनी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार केली. या तक्रारीची सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे व संचालक मंडळाने डी.डी.आर. अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केल्याबरोबर डी.डी.आर. अधिकाऱ्यांनी याची तत्काळ दखल घेऊन न्यायाधिकरणाची नेमणूक केली.
त्यानंतर दोन-तीन तारखांमध्येच सुनावणी करून या व्यापाऱ्याची संपत्ती विकून ४७ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे अदा करावे, असा ऐतिहासिक निर्णय यावेळी दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना आदेश दिल्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी कुठलाही विलंब न करता व्यापाऱ्यानी जी मार्केट कमिटीला जमीन तारण दिली होती,
बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय
• राज्यात प्रचमच बाजार समितीकडून असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याने सर्वत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे कौतुक केले जात आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सभापती प्रशांत कड उपसभापती योगेश बर्डे सहाय्यक निबंधक वैभव मोराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
• तर तहसीलदार मुकेश कांबळे यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने प्रशांत कड व संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी कैलास कांगणे, पोपट वाघ, भास्कर सानप संदीप गायकवाड, मनोहर आव्हाड सुनील गायकवाड, मधुकर गायकवाड अशोक वाघ, निखिल उंबरे, गणेश दराडे, आदी उपस्थित होते.