Lokmat Agro >बाजारहाट > शेतकरी आर्थिक संकटात; राज्यातील बाजारात सर्वत्र शेतमालाचे दर 'एमएसपी'पेक्षा कमीच

शेतकरी आर्थिक संकटात; राज्यातील बाजारात सर्वत्र शेतमालाचे दर 'एमएसपी'पेक्षा कमीच

Farmers in financial crisis; Prices of agricultural products everywhere in the state's markets are lower than 'MSP' | शेतकरी आर्थिक संकटात; राज्यातील बाजारात सर्वत्र शेतमालाचे दर 'एमएसपी'पेक्षा कमीच

शेतकरी आर्थिक संकटात; राज्यातील बाजारात सर्वत्र शेतमालाचे दर 'एमएसपी'पेक्षा कमीच

Agriculture Market Update : यंदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात विक्रमी उत्पादन झाल्यामुळे गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. आरबीआयने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, अन्नधान्ये आणि डाळी यांच्या किमती मोठ्या प्रमाणात पडलेल्या आहेत.

Agriculture Market Update : यंदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात विक्रमी उत्पादन झाल्यामुळे गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. आरबीआयने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, अन्नधान्ये आणि डाळी यांच्या किमती मोठ्या प्रमाणात पडलेल्या आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

यंदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात विक्रमी उत्पादन झाल्यामुळे गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. आरबीआयने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, अन्नधान्ये आणि डाळी यांच्या किमती मोठ्या प्रमाणात पडलेल्या आहेत.

बुलेटिननुसार, शेतमालाचे भाव पडलेले असताना सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी आणि अन्य तेलाच्या किमती मात्र वाढत आहेत. पाम आणि शेंगदाणा तेलाच्या किमतीत थोडी नरमाई दिसत आहे. कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. बटाटे आणि टोमॅटोच्या किमती वाढल्या आहेत. केंद्र सरकार २३ पिकांच्या किमान आधारभूत किमती जारी करत असते.

हे अन्नसुरक्षेसाठी चांगले लक्षण, पण...

प्रमुख खरीप आणि रब्बी पिकांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनामुळे आणि महागाई रोखण्यासाठी धोरणात्मक उपाययोजनांमुळे, प्रमुख पिकांच्या (गहू वगळता) सरासरी बाजारभावात घट झाली आहे आणि ते त्यांच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) कमी आहेत, हे देशाच्या अन्न सुरक्षेसाठी एक चांगले लक्षण मानले जात असले तरी शेतकऱ्यांपुढे मात्र आर्थिक संकट निर्माण करणारे आहे.

एमएसपी आणि बाजारभावातील फरक

पीक २०२४ २०२५ 
मका ▼ ०.८ ▼ ८.१ 
भात ▲ ६.० ▼ २.४ 
गहू ▲ १.९ ▲ १.२ 
तूर ▲ ५२.९ ▼ ७.१ 
मूग ▲ १.५ ▼ ६.७ 
मसूर ▼ ८.० ▼ ४.९ 
उडीद ▲ २९.६ ▼ २.१ 
चणा ▲ ६.६ ▼ ०.६ 
शेंगदाणे  ▼ ३.५ ▼ २४.३ 
सोयाबीन ▼ २.६ ▼ १४.० 
मोहरी ▼ ८.२ ▼ २.१ 

(फरक टक्क्यांमध्ये)

गव्हासाठी एमएसपीवर बोनस : राजस्थान व मध्य प्रदेशने गव्हासाठी एमएसपीवर प्रतिक्विंटल १५० आणि १७५ रुपये बोनस जाहीर केला आहे.

हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

Web Title: Farmers in financial crisis; Prices of agricultural products everywhere in the state's markets are lower than 'MSP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.