Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > तूर खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ; किती तारखेपर्यंत सुरु राहणार नोंदणी? काय राहणार खरेदी दर?

तूर खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ; किती तारखेपर्यंत सुरु राहणार नोंदणी? काय राहणार खरेदी दर?

Extension of the deadline for registration for purchase of tur; Till what date will the registration continue? What will be the purchase price? | तूर खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ; किती तारखेपर्यंत सुरु राहणार नोंदणी? काय राहणार खरेदी दर?

तूर खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ; किती तारखेपर्यंत सुरु राहणार नोंदणी? काय राहणार खरेदी दर?

tur kharedi शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन महासंघाच्या वतीने तूर खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे.

tur kharedi शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन महासंघाच्या वतीने तूर खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे.

अहिल्यानगर : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात तूर खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे.

जिल्ह्यात एकूण १० खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, संबंधित केंद्रांवर शेतकरी नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली आहे.

हंगाम २०२४-२५ करिता तुरीचा हमीभाव प्रति क्विंटल ८ हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. शेतकरी नोंदणीला २४ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

खरेदी कालावधी ९ फेब्रुवारी ते ९ मे असा राहणार आहे. शेतकऱ्यांनी चालू हंगामातील सर्वसाधारण सरासरी दर्जाची तूर खरेदी केंद्रांवर आणावी. एन.सी.सी.एफ. यांनी निर्धारित केलेल्या निर्देशानुसार तुरीची तपासणी करण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे
खरेदी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून नोंदणीसाठी आधारकार्ड छायांकित प्रत, बँक पासबुक प्रत, ७/१२ व ८-अ उतारा, तूर पिकाची ऑनलाईन नोंद आणि मोबाइल क्रमांक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

तूर खरेदी केंद्र
१) शेवगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ (शेवगाव)
२) जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था, पाथर्डी (मार्केट यार्ड, पाथर्डी)
३) श्रीदत्त पणन सहकारी संस्था, श्रीगोंदा (घारगाव)
४) रियल ॲग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी, श्रीगोंदा (घुटेवाडी)
५) जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी, श्रीगोंदा (मांडवगण)
६) राहुरी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ (राहुरी)
७) पारनेर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ (पारनेर)
८) बहादराबाद विविध कार्यकारी सोसायटी, कोपरगाव (रांजणगाव देशमुख)
९) चैतन्य कानिफनाथ कृषी फळे प्रक्रिया सहकारी संस्था, जामखेड (खर्डा)
१०) पुण्यश्लोक कृषी पणन प्रक्रिया सहकारी संस्था, जामखेड (पिंपरखेड)

अधिक वाचा: कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या भोगवटादार वर्ग-२ जमिनी आता मालकीच्या होणार; कसा होणार फायदा?

Web Title: Extension of the deadline for registration for purchase of tur; Till what date will the registration continue? What will be the purchase price?