Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > कृषीमाल आयात-निर्यात करणाऱ्या कंटेनरवर आता आपत्कालीन अधिभार; कोणत्या कंटेनरवर किती अधिभार?

कृषीमाल आयात-निर्यात करणाऱ्या कंटेनरवर आता आपत्कालीन अधिभार; कोणत्या कंटेनरवर किती अधिभार?

Emergency surcharge on containers importing and exporting agricultural goods; How much surcharge on which container? | कृषीमाल आयात-निर्यात करणाऱ्या कंटेनरवर आता आपत्कालीन अधिभार; कोणत्या कंटेनरवर किती अधिभार?

कृषीमाल आयात-निर्यात करणाऱ्या कंटेनरवर आता आपत्कालीन अधिभार; कोणत्या कंटेनरवर किती अधिभार?

मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी आयात निर्यात करण्यात येणाऱ्या प्रत्येक कंटेनरवर २ मार्चपासून आपत्कालीन संघर्ष अधिभार (ECS) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी आयात निर्यात करण्यात येणाऱ्या प्रत्येक कंटेनरवर २ मार्चपासून आपत्कालीन संघर्ष अधिभार (ECS) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मधुकर ठाकूर
उरण : मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी आयात निर्यात करण्यात येणाऱ्या प्रत्येक कंटेनरवर २ मार्चपासून अतिरिक्त २,००० ते ४,००० अमेरिकन डॉलर्स इतका आपत्कालीन संघर्ष अधिभार (ECS) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

या अधिभारामुळे आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. तर, या परिस्थितीमुळे जेएनपीए बंदरात केळीचे १,००० आणि कांदा, द्राक्षांचे १,००० असे २,००० कंटेनर अडकल्याची माहिती जेएनपीएने अधिकृतपणे दिली.

मध्यपूर्व आशियातील देशांमध्ये भडकलेल्या युद्धामुळे होर्मुझची खाडी मालवाहू जहाजांना कधीही बंद अथवा खुली केली जात आहे. या खाडीत जहाजांवरही हल्ले होण्याची भीती आहे.

त्यामुळे शिपिंग कंपन्यांनी युद्धजन्य देशांमध्ये व त्यामधून आयात निर्यात होणाऱ्या कार्गो कंटेनर डिस्चार्ज किंवा लोड केलेले नाहीत.

त्यातच युद्धजन्य प्रभावित क्षेत्रांमध्ये ऑपरेशन्स सुरक्षित करण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून शिपिंग कंपन्यांनी बहरीन, कुवेत, जिबूती, ओमान, इजिप्त (ऐन सोखना बंदर), कतार, एरिट्रिया, सुदान, इराक, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, येमेन, सौदी अरेबिया येथे पाठविण्यात येणाऱ्या कंटेनरवर आपत्कालीन संघर्ष अधिभार आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्गो कंटेनर बंदरात ठेवून घेण्यासाठी सहकार्य
◼️ युद्धाच्या परिस्थितीमुळे जेएनपीए बंदरात शनिवारपासून दोन हजार कंटेनर अडकले आहेत.
◼️ सध्यातरी जेएनपीए बंदरात आयात निर्यात फारसा परिणाम जाणवत नसला, तरी येत्या काही दिवसांत तो जाणवेल.
◼️ याबाबत जेएनपीए अध्यक्ष गौरव दयाल यांच्याशीही चर्चा झाली आहे.

शिपिंग कंपन्यांनी मागणी केल्यास युद्ध परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या आयात-निर्यात होणारे कार्गो कंटेनर बंदरात ठेऊन घेण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका अध्यक्षांनी अधिकृत घेतली आहे, अशी माहिती जेएनपीए कंटेनर वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी गिरीश थॉमस यांनी दिली

कोणत्या कंटेनरवर किती अधिभार
सीएमए सीजीएम या शिपिंग कंपनीने जाहीर केलेल्या आपत्कालीन संघर्ष अधिभारानुसार २० फूट ड्राय कंटेनरसाठी २००० यूएस डॉलर्स (१,८३,८४० रुपये), ४० फूट ड्राय कंटेनरसाठी ३,००० यूएस डॉलर्स (२,७५,७६० रुपये) आणि रेफर किंवा विशेष उपकरणांच्या कंटेनरसाठी ४,००० यूएस डॉलर्स (३,६७,६८० रुपये) आकारण्यात येणार आहे.

केळी, द्राक्ष खराब होण्याच्या मार्गावर
◼️ जेएनपीए बंदरात शनिवारपासून केळ्याचे १,००० कंटेनर अडकले आहेत. येत्या १०-१५ दिवसांत केळ्यांचे कार्गो कंटेनर निर्यात झाले नाहीत, तर माल खराब होण्याची भीती केळी निर्यातदार व जी फाइव्ह मार्ट वन प्रा. लि. कंपनीचे मालक शब्बीर केपी यांनी व्यक्त केली.
◼️ तसेच, बंदरात कांदा व द्राक्षांचे एकूण १,००० कंटेनर अडकले असल्याची माहिती निर्यातदार व्यापारी राहुल पवार यांनी दिली.

अधिक वाचा: महिना १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना सोलरमध्ये होणार १५ हजार रुपयांची बचत; वाचा सविस्तर

Web Title: Emergency surcharge on containers importing and exporting agricultural goods; How much surcharge on which container?