चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा, लसूण आणि हिरव्या मिरचीचे भाव तेजीत राहिले.
नवरात्र उत्सवामुळे रताळ्याची ३० टन आवक होऊन उच्चांकी नोंद झाली. मात्र, पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने त्यांचे भाव कोसळले. बाजारातील एकूण उलाढाल ४ कोटी १० लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक ७५० क्विंटल झाली, यामुळे कांद्याचा कमाल भाव १,५०० रुपयांवरून १,३०० रुपये, मध्यम भाव १,००० रुपये आणि किमान भाव ८०० रुपये झाला.
बटाट्याची आवक २,००० क्विंटल स्थिर राहिली; परंतु भावात २०० रुपयांची वाढ झाली. कमाल भाव १,८०० रुपयांवरून २,००० रुपये, मध्यम भाव १,६०० रुपये आणि किमान भाव १,२०० रुपये नोंदवला गेला.रताळ्याला मागणीनवरात्र उत्सवामुळे रताळ्याची मागणी वाढली असून, १४५ क्विंटल आवक झाली. रताळ्याचा भाव २,००० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. आडतदार भानुदास बुटे, रवींद्र बोराटे आणि धनंजय बोराटे यांनी रताळ्याला मोठी मागणी असल्याचे सांगितले.
लसूण आणि हिरवी मिरची आवकलसणाची आवक ४० क्विंटल झाली असून, कमाल भाव ८,००० रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ३७७ क्विंटल होती, भाव २,५०० ते ३,५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.
अधिक वाचा: दुधाच्या ४ पट कॅल्शियम असणारी अन् ३०० विकारांवर मात करणारी 'ही' भाजी खाल्लीय का?
Web Summary : Chakan market saw increased potato and sweet potato arrivals due to Navratri. Potato prices rose, while vegetable prices fell due to high supply. Sweet potato demand surged, fetching ₹2,000-3,000/quintal. Garlic and green chili prices remained strong. Total market turnover reached ₹4.1 crore.
Web Summary : नवरात्रि के कारण चाकन बाजार में आलू और शकरकंद की आवक में वृद्धि हुई। आलू की कीमतों में वृद्धि हुई, जबकि सब्जियों की अधिक आपूर्ति के कारण कीमतें गिर गईं। शकरकंद की मांग बढ़ी, ₹2,000-3,000/क्विंटल मिला। लहसुन और हरी मिर्च की कीमतें मजबूत रहीं। कुल बाजार कारोबार ₹4.1 करोड़ रहा।