Lokmat Agro >बाजारहाट > जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सुकामेवा आजपासून स्वस्त; कोणत्या सुकामेव्याला कसा दर?

जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सुकामेवा आजपासून स्वस्त; कोणत्या सुकामेव्याला कसा दर?

Dry fruits are cheaper from today due to reduction in GST rates; Which dry fruits are priced at what rates? | जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सुकामेवा आजपासून स्वस्त; कोणत्या सुकामेव्याला कसा दर?

जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सुकामेवा आजपासून स्वस्त; कोणत्या सुकामेव्याला कसा दर?

Dry Fruit Market Update नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे.

Dry Fruit Market Update नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना आज सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारनेजीएसटीचे दर कमी केले आहे.

यामध्ये ड्रायफ्रूट सुकामेव्याचे दर १२ टक्क्यांवरून जीएसटी ५ टक्के करण्यात आले आहे. यामुळे खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर, आक्रोड, जर्दाळू आदी सुकामेवा प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त होणार आहे.

नवरात्र उत्साहात मोठ्या प्रमाणात उपवास केला जातो. नवरात्रात खजुराला मागणी जास्त असते. आता खजूर ३५० वरून ३१५ रुपये प्रतिकिलो झाले आहे.

सुकामेवा स्वस्त झाल्याने सामान्यांच्या आवाक्यात दर आले आहेत. त्यामुळे सामान्यांची दसरा-दिवाळीही यंदा गोड होणार आहे.

केंद्र सरकारने जीएसटीचे दर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के केल्यामुळे खजूर, बदाम, पिस्ता प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त झाले.

सुकामेव्याचे दर आजपासून असे असतील
प्रकार | आताचे दर प्रतिकिलो | जीएसटी दर कमी दर
खजूर | ३३६ | ३१५
बदाम | ८९६ | ८४०
पिस्ता  १,२५० |  १,१५०
आक्रोड | १,२५० | १,१५०
अंजीर | १,५०० | १,३००
खारीक | २८० | २५०
जर्दाळू | ५०० | ४००

केंद्र सरकारने १२ टक्क्यांवरून ५ टक्के जीएसटी केल्याने ड्रायफ्रूट दरात घट झाली असून ३६० चा खजूर २७० पर्यंत आला. सामान्यांची दिवाळी गोड होईल. - नवीन गोयल, ड्रायफ्रूट व्यापारी व दी पूना मर्चट चेंबर सदस्य

नवरात्र उत्साहात आमच्या घरामध्ये नऊ दिवस उपवास केला जातो. यावर्षी उपवास केल्यामुळे, ड्रायफ्रूट स्वस्त मिळाल्याने दिवाळी गोड होणार आहे. - नकुल जोशी, नागरिक

अधिक वाचा: शेतकऱ्याच्या कन्येला व्हायचं होतं शिक्षिका पण झाली आशियातली पहिली महिला रेल्वेचालक

Web Title: Dry fruits are cheaper from today due to reduction in GST rates; Which dry fruits are priced at what rates?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.