Lokmat Agro >बाजारहाट > Dry Fruit Market : राज्यात वाढला थंडीचा कडाका, सुकामेव्याच्या दरालाही तडाखा

Dry Fruit Market : राज्यात वाढला थंडीचा कडाका, सुकामेव्याच्या दरालाही तडाखा

Dry Fruit Market : Cold wave intensifies in the state, prices of dry fruits also hit | Dry Fruit Market : राज्यात वाढला थंडीचा कडाका, सुकामेव्याच्या दरालाही तडाखा

Dry Fruit Market : राज्यात वाढला थंडीचा कडाका, सुकामेव्याच्या दरालाही तडाखा

राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आणि आरोग्यासाठी मागणी वाढली आहे.

राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आणि आरोग्यासाठी मागणी वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अजित घस्ते
पुणे: राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आणि आरोग्यासाठी मागणी वाढली आहे.

यंदा जगभरात बहुतांशी सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या सुकामेव्याच्या दरात वाढ १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या सुकामेव्याचा बाजार तेजीत आहे.

दोन वर्षे सातत्याने सुकामाव्याचे दर कमी होते; परंतु यंदा ग्राहकांना काही प्रमाणात सुकामेवा महाग खरेदी करावा लागत आहे. सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना याची झळ बसत आहे; परंतु यंदा थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीवर भर देत आहेत.

बाजारात बदाम, खोबरे, जर्दाळू, अक्रोड, मनुका, पिस्ता, काजू, डिंक, खोबरे, जर्दाळूच्या मागणीत वाढ झाली आहे. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. शरीरातील कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषक तत्त्व शरीराला उपयोगी पडतात.

देशांतर्गत आवक
खोबरे : तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक.
काजू : गोवा, कर्नाटक, कोकण, केरळ.
मनुके : सांगली, विजापूर, नाशिक, पंढरपूर.

सुकामेव्याचे प्रतिकिलोचे भाव

वस्तूचे नावनोव्हेंबर २०२४डिसेंबर २०२४
काजू५५० ते ८५०८०० ते १२००
अक्रोड बी८०० ते १२००१००० ते १५००
अक्रोड (अख्खा)४५० ते ६००६०० ते ८००
बदाम५०० ते ८००५०० ते ८००
अंजीर७०० ते १०००१००० ते १५००
काळे मनुके३०० ते ४००५०० ते ६००
बेदाणा (भारतीय)२०० ते ३००२०० ते ३००
खारा पिस्ता७०० ते १०००१००० ते १५००
जर्दाळू२०० ते ४००३०० ते ५००

कशामुळे महाग?
■ वातावरणाच्या परिणामामुळे उत्पादनात घट.
■ आयात होत असलेला सुकामेवा महागच येत आहे.
■ भारतात वाढती मागणी.
■ अतिउष्णता, अनियमित पर्जन्यमानामुळे काजूचे जागतिक उत्पादन घटले.
■ झाडांवरून कमी निघाल्याने कच्चा काजूचा तुटवडा.

मागणी वाढली
थंडीत सुकामेव्याला मागणी दिवाळीत थंडीची चाहूल लागताच सुकामेव्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. शरीराचीही कॅलरीची गरज पूर्ण होते.

यंदा जगभरात सततच्या वातावरणाच्या परिणामामुळे उत्पादनात घट झाली आहे. मार्चमध्ये नवीन पीक आल्यानंतर दरात घट होईल. इराण युद्धामुळे खजूर, काळा मनुका, अंजीर, केसर, शहाजिरा दरात वाढ झाली आहे. दरात अंदाजे १५-२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. - शुभम गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड

Web Title: Dry Fruit Market : Cold wave intensifies in the state, prices of dry fruits also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.