Lokmat Agro >बाजारहाट > बाजार समिती कर्मचाऱ्यांना आता ड्रेस कोड अनिवार्य; ठराव संमत

बाजार समिती कर्मचाऱ्यांना आता ड्रेस कोड अनिवार्य; ठराव संमत

Dress code now mandatory for market committee employees; Resolution passed | बाजार समिती कर्मचाऱ्यांना आता ड्रेस कोड अनिवार्य; ठराव संमत

बाजार समिती कर्मचाऱ्यांना आता ड्रेस कोड अनिवार्य; ठराव संमत

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मात्र बाजार समितीच्या वतीने ड्रेस पुरवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मात्र बाजार समितीच्या वतीने ड्रेस पुरवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मात्र बाजार समितीच्या वतीने ड्रेस पुरवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर आज संचालक मंडळाची पहिली सभा सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा करण्याचा ठराव संमत करण्यात आला. आर्थिक व्यवहारासाठी सह्यांचे अधिकार आणि त्याबाबतचे सर्वाधिकार सभापती दिलीप माने यांना देण्याचा ठराव एकमताने करण्यात आला.

सभापतीपद न मिळाल्याने नाराज असलेले संचालक राजशेखर शिवदारे संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीला अनुपस्थित राहिले. या बैठकीसाठी त्यांनी रजेचा लेखी अर्ज पाठवल्याचे समजते. सभापती निवडीप्रसंगी तसेच लक्ष्मीबाई भाजी मंडई व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभाकडे शिवदारे यांनी पाठ फिरवली होती.

हेही वाचा : तीन महिन्यांत तीन लाखांचा नफा; संभाजीरावांच्या कारल्याच्या आधुनिक शेतीची यशोगाथा

Web Title: Dress code now mandatory for market committee employees; Resolution passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.