अशोक डोंबाळेसांगली: निर्यात द्राक्षांसाठी पोषक वातावरण आणि परदेशात चांगला दर मिळत असल्यामुळे दि. १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातून २७२ कंटेनरमधून आतापर्यंत तीन हजार ६००.७१ टन द्राक्षांची निर्यात केली आहे.
नेदरलँड, सोदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये सर्वाधिक द्राक्ष निर्यात झाली आहे. दरही चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत आहे.
मान्सून आणि परतीचा मान्सून तुफान पाऊस झाल्यामुळे वेळेवर द्राक्षाच्या छाटण्या झाल्या नाहीत. आगाम छाटणी झालेल्या द्राक्षांचे नुकसान झाले.
गेल्या दोन वर्षांत द्राक्षांना चांगला दर मिळाला नसल्यामुळे राज्यातील ६० हजार एकर द्राक्षबागांवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली. या सर्व कारणांमुळे राज्यात २० ते २५ टक्के द्राक्षबागांचे क्षेत्र घटले आहे.
परिणाम यावर्षी द्राक्षाला देशातंर्गत चांगला दर मिळत आहेच, पण, निर्यात द्राक्षालाही प्रतिकिलो ८० ते ८५ रुपये दर मिळत आहे.
सांगली जिल्ह्यातून २७२ कंटेनरमधून तीन हजार ६००.७१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे, अशी माहिती निर्यातीचे कृषी अधिकारी प्रकाश नागरगोजे यांनी दिली. नेदरलँड, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, चीन, डेन्मार्कमधून द्राक्षाची सर्वाधिक मागणी आहे.
गेल्या पाच वर्षांत यावर्षी जिल्ह्यातून द्राक्षनिर्यात वाढणार आहे, असा अंदाज निर्यातदार विशाल जोशी यांनी व्यक्त केला आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक द्राक्ष निर्यात होईल, असेही ते म्हणाले.
या द्राक्षांना सर्वाधिक मागणी थॉमसन, माणिकचमन, सोनाका, सुपर सोनाका, तास-ए-गणेश, क्रिमसन आदी वाणांच्या द्राक्षांना परेदशात सर्वाधिक मागणी आहे. असेही निर्यातदार विशाल जोशी यांनी सांगितले.
देशात आणि परदेशातही दर द्राक्षांचा दर्जा उत्तम असून, गोडी चांगली आहे. देशात द्राक्षांचे उत्पन्न २० ते २५ टक्क्यांनी घटले आहे. देशांतर्गत द्राक्षांना चांगली मागणी असल्यामुळे दर चांगले आहेत. परदेशातही नेहमीपेक्षा जास्त मागणी असून, निर्यात द्राक्षाला सध्या ८० ते ८५ रुपये किलोला दर मिळत आहे, अशी माहिती द्राक्षनिर्यातदार विशाल जोशी यांनी दिली.
अशी झाली द्राक्षांची निर्यातदेश - कंटेनर - टन (कंसात)चीन - १८ (१८१.४२)डेन्मार्क - १२ (१४०.९२)जर्मनी - ०४ (५९.७)हाँगकाँग - ०४ (५०.९८)आयर्लंड - ०१ (१३)मलेशिया - ०९ (११५.९८)नेदरलँड - ९४ (११६५.२९)नॉर्वे - ०१ (१३) कतार - ०४ (५७.३४) रोमानिया - ०३ (२९.३९)रशियन फेडरेशन - ०५ (९५.४२) सौदी अरेबिया - ४३ (६३९.२३) स्पेन - ०५ (६५)तैवान - ०३ (३९)संयुक्त अरब अमिराती - ४८ (६९२.९८) युनायटेड किंगडम - १८ (२४२.०६)
अधिक वाचा: केळी निर्यातीत सोलापूर जिल्ह्यातील ही दोन गावं जगाच्या नकाशावर; वाचा सविस्तर