राहुरी : सध्या द्राक्षांचा सिझन सुरू झाला आहे. द्राक्षांची मागणी चांगली असल्याने भावदेखील तेजीत आहेत. द्राक्ष खरेदी करण्यासाठी विविध राज्यांतील व्यापारी राहुरीत दाखल झाले आहेत.
राहुरीच्या द्राक्षांनी जणू देशभरात भुरळ पाडली आहे. यापूर्वी वर्षानुवर्षे सुरुवातीला भाव जास्त राहत होते. नंतर ते कमी होत होते; परंतु यंदाच्या वर्षी सुरुवातीपासून शेवटपर्यंत भाव टिकून राहतील, असे व्यापारी सांगतात.
राहुरीच्या मार्केटला भूम व परंडा; तसेच स्थानिक (वांबोरी, श्रीगोंदा) शेतकऱ्यांचे द्राक्ष दाखल होत आहेत. प्रत्येक ऋतूत फळे खाणे फायदेशीर असते.
बदलत्या ऋतूंप्रमाणे अनेक फळेबाजारात उपलब्ध असतात. ही फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. विशेषतः उन्हाळ्यात फळे आपल्याला हायड्रेटेड; तसेच ताजेतवाने ठेवतात.
या काळामध्ये सर्वात जास्त मिळणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे द्राक्ष. द्राक्ष खाण्याचे अगणित फायदे आहेत. द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात. द्राक्षात फायबर, प्रथिने, लोह, तांबे, फोलेट, व्हिटॅमिन सी, ए, के आणि बी इत्यादी घटक असतात.
द्राक्षाच्या या व्हरायटी दाखल
थॉमसन सीडलेस : ३५-४५
सुपर सोनाका : ७०-७५
सोनाका : ६०-७०
माणिक चमन : ५०-६०
आवक कमी भाव चांगले
सध्या द्राक्षांचा सिझन सुरू झाला आहे. आवकही अत्यल्प आहे. त्यामुळे भाव चांगले आहेत. यंदाच्या वर्षी मंदी असल्याने शेवटपर्यंत भाव टिकून राहतील अशी शक्यता व्यापारीवर्गातून व्यक्त केली.
अनेक शेतकऱ्यांनी रोगराई व व्यवस्थापनामुळे द्राक्षबागा उपटून टाकल्या. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे. सध्या ३५ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत भाव मिळत असला तरी हेच भाव शेवटी १०० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. - दीपक रकटे, फळांचे व्यापारी
अधिक वाचा: Kanda Bajar Bhav : अनेक वर्ष बंद पडलेले कांदा मार्केट पुन्हा सुरु; कांद्याला मिळतोय जोरदार दर