मिलिंद राऊळमागील महिन्यात बाजारपेठेत केवळ १० ते १५ रुपये प्रति नग या किमतीत विक्री होणारा ड्रॅगन फ्रुट आता २२० ते २८० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
लाल रंगाचा ड्रॅगन फ्रुट २४० रूपये किलो, तर ८० रुपये प्रति नग, तर पांढऱ्या रंगाचा १६० रुपयांपर्यंत किलो तर ६० रुपये प्रति नग प्रमाणे विक्री होत आहे.
ड्रॅगन फ्रुटचा मुख्य हंगाम जून ते नोव्हेंबर असा असतो. उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानात पिकणारे हे फळ ३०-५० दिवसांत तयार होते.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सोलापूर जिल्ह्यातून होणारी ड्रॅगन फ्रुटची आवक कमी आहे.
परिणामी बाजारपेठेत येणारा ड्रॅगन फ्रूट मुख्यतः व्हिएतनाममधून येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जिल्ह्यात देखील पांढरा गर व लाल साल असणाऱ्या प्रजातीची लागवड केली जाते.
ड्रॅगन फ्रूट - सुपर फ्रूट१) या फळामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि विविध पोषणमूल्ये मुबलक प्रमाणात असतात.२) विषाणूजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया, कावीळ यांसारख्या आजारांवर ते फायदेशीर असून शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढवण्यासाठी हे फळ खूप उपयुक्त असल्याचे पोषणतज्ज्ञ सांगतात.३) ड्रॅगन फळाचा गर, साल, बिया, फुलांच्या कळ्या आणि वाळलेली फुले आणि खोड अत्यंत पौष्टिक असतात, ज्यामध्ये बायोएक्टिव्ह संयुगे, फायबर, व्हिटॅमिन-८, कॅल्शियम आणि फॉस्फरस, आदी पौष्टिक पदार्थ असतात.
अधिक वाचा: Peru Fal : हिवाळ्यात का खावा पेरू? काय आहेत फायदे; वाचा सविस्तर