Lokmat Agro >बाजारहाट > टोमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेता वाहतूक व साठवणूक खर्च केंद्र सरकार उचलणार

टोमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेता वाहतूक व साठवणूक खर्च केंद्र सरकार उचलणार

Considering the falling prices of tomatoes, the central government will bear the transportation and storage costs | टोमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेता वाहतूक व साठवणूक खर्च केंद्र सरकार उचलणार

टोमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेता वाहतूक व साठवणूक खर्च केंद्र सरकार उचलणार

TOP Crop एनसीसीएफच्या माध्यमातून टोमॅटोसाठी बाजार हस्तक्षेप योजनेच्या वाहतूक घटकाची अंमलबजावणी करायला केंद्रसरकारची मंजुरी.

TOP Crop एनसीसीएफच्या माध्यमातून टोमॅटोसाठी बाजार हस्तक्षेप योजनेच्या वाहतूक घटकाची अंमलबजावणी करायला केंद्रसरकारची मंजुरी.

शेअर :

Join us
Join usNext

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये टोमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेता, भारत सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेच्या (एमआयएस) वाहतूक घटकाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेअंतर्गत उत्पादक आणि ग्राहक राज्यांमध्ये टीओपी पिकांच्या (टोमॅटो, कांदा आणि बटाटा) किमतीत तफावत असेल, तेव्हा उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत पुढील निर्णय घेतला आहे.

उत्पादक राज्यातून इतर ग्राहक राज्यांमध्ये पिकांची वाहतूक आणि साठवणूक करण्यासाठी होणाऱ्या ऑपरेशनल (परिचालन) खर्चाची प्रतिपूर्ती नाफेड आणि एनसीसीएफ सारख्या केंद्रीय नोडल एजन्सींना (सीएनए) केली जाईल.

टोमॅटोच्या दरात झालेली मोठी घसरण लक्षात घेता, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात एनसीसीएफच्या माध्यमातून टोमॅटोसाठी एमआयएसच्या वाहतूक घटकाची अंमलबजावणी करायला मंजुरी दिली आहे. एनसीसीएफ लवकरच वाहतूक परिचालन सुरू करण्याची व्यवस्था करत आहे.

अधिक वाचा: Harbhara Bajar Bhav : दुधनी बाजार समितीत हरभऱ्याला मिळतोय हमीभावापेक्षा जादा दर

Web Title: Considering the falling prices of tomatoes, the central government will bear the transportation and storage costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.