सुपे : येथील उपबाजारात शनिवारपासून (दि. २२) सकाळी ११ वाजता चालू वर्षीच्या हंगामातील चिंच लिलावाचा शुभारंभ सभापती विश्वासराव आटोळे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
येथील उपबाजारात चिंचेच्या हंगामात दर शनिवारी लिलाव होत असतात. आज पहिलाच चिंच बाजार असल्याने शेतकऱ्यांनी आपली चिंच स्वच्छ, वाळवून व चांगल्या पॅकिंगमध्ये बाजारात आणावी.
तसेच शेतकऱ्यांनी आपला माल लिलावापूर्वी बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन सर्व चिंच उत्पादक शेतकऱ्यांना बारामती बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सुपे उपबाजार ही चिंच लिलावासाठी प्रसिद्ध अशी जुनी बाजारपेठ आहे. त्यामुळे बारामती तालुक्यासह शिरूर, दौंड, पुरंदर, फलटण, श्रीगोंदा, इंदापूर, भोर इत्यादी तालुक्यातून तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून चिंच विक्रीसाठी येत असते. त्यामुळे खरेदीदारांनी वेळेत उपस्थित राहावे.
गतवर्षी अखंड चिंचेस किमान २२०० ते कमाल ५००० प्रतिक्विंटल तर फोडलेल्या चिंचेला किमान ४५०० व कमाल १०,००० प्रतिक्विंटल असे बाजारभाव मिळाले.
चिंच खरेदीसाठी बारामती, पुणे, बार्शी, तुळजापूर, लातूर, औरंगाबाद आदी भागातून खरेदीदार येत असतात, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
अधिक वाचा: Jamin Mojani : एक हेक्टर जमिनीची मोजणी आता होणार फक्त एका तासात; आलंय हे नवं तंत्रज्ञान