राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे बुधवार (दि.२८) रोजी सकाळी विमान अपघातात निधन झाले. ज्यामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला.
दरम्यान राज्यातील अनेक बाजारात समितीत गुरुवार (दि.२९) रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खरेदी-विक्री लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. ज्यात पुणे महानगरपालिका अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मुख्य बाजार आवारातील फळे भाजीपाला विभाग, पान बाजार, केळी बाजार, गुरांचा बाजार, गुळभुसार बाजार, फुलांचा बाजार, भुईकाटा केंद्र, पेट्रोल पंप विभाग तसेच मोशी उपबाजार, उत्तमनगर उपबाजार, मांजरी उपबाजार आणि खडकी उपबाजार बंद राहणार आहे.
अहिल्यानगर आणि नाशिक सह राज्यातील अनेक बाजार राहणार बंद
• कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अंतर्गत असलेला भुसार विभाग, भाजीपाला विभाग, कडबा विभाग व नेप्ती उपबाजार येथील कांदा लिलाव गुरुवारी पूर्णपणे बंद राहणार आहे.
• तसेच नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील मुख्य उपबाजार आवारातील कांदा व धान्य लिलाव आणि विंचूर उपबाजार आवारातील सर्व शेतीमालाचे लिलाव गुरूवारी बंद राहणार आहे.
शेतमाल विक्रीस आणू नये
गुरुवारी राज्यातील अनेक बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणू नये अशा सूचना बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
Web Summary : Following Deputy Chief Minister Ajit Pawar's death, many market committees across Maharashtra will suspend auctions. This includes Pune, Ahilyanagar, and Nashik markets. Farmers are advised not to bring produce for sale.
Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार के निधन के बाद, महाराष्ट्र की कई बाजार समितियाँ नीलामी स्थगित करेंगी। इसमें पुणे, अहिल्यानगर और नासिक बाजार शामिल हैं। किसानों को सलाह दी जाती है कि वे बिक्री के लिए उपज न लाएँ।