Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > उन्हाचा पारा चढताच लिंबाला ७० रूपयांचा भाव; बाजारात मागणी वाढली, आवकेत मात्र घट

उन्हाचा पारा चढताच लिंबाला ७० रूपयांचा भाव; बाजारात मागणी वाढली, आवकेत मात्र घट

As the summer heats up, the price of lemons reaches Rs 70; Demand increases in the market, but supply decreases | उन्हाचा पारा चढताच लिंबाला ७० रूपयांचा भाव; बाजारात मागणी वाढली, आवकेत मात्र घट

उन्हाचा पारा चढताच लिंबाला ७० रूपयांचा भाव; बाजारात मागणी वाढली, आवकेत मात्र घट

Lemon Market Rate : तापमानाचा पारा चढू लागल्याने सरबत विक्रेत्यांसह रसवंती गृहे, हॉटेल व्यावसायिक, तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लिंबाचे दर वधारले आहेत.

Lemon Market Rate : तापमानाचा पारा चढू लागल्याने सरबत विक्रेत्यांसह रसवंती गृहे, हॉटेल व्यावसायिक, तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लिंबाचे दर वधारले आहेत.

नितीन कांबळे 

तापमानाचा पारा चढू लागल्याने सरबत विक्रेत्यांसह रसवंती गृहे, हॉटेल व्यावसायिक, तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लिंबाचे दर वधारले आहेत.

सध्या सर्वत्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे. स्थानिक बाजारात लिंबाचा दर वाढल्याचे दिसून येत आहे.

उन्हाळ्याची चाहूल, पारा ३२ अंशांवर

उन्हाची चाहूल लागली असून, पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या उन्हाचा पारा हा ३२ अंशांवर आहे.

तुलनेत पुरवठा कमी

उन्हाळ्यात लिंबाची आवक कमी होत असते आणि मागणी वाढत असते. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याचे विक्रेते सांगतात.

आवक घटली, दर वाढणार

लिंबाची आवक कमी झाली असून, मागणी वाढल्याने दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. सध्या ७० रुपये भाव असून, नंतर दीडशे पार जाऊ शकते, असे लिंबू अडत व्यापारी सचिन वाघुले यांनी 'लोकमत'ला सांगितले.

रसवंती, हॉटेल, ग्राहकांकडून मागणी वाढली

हळूहळू उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे रसवंत्या, हॉटेलवर लिंबाला मागणी वाढली असल्याचे शहरासह ग्रामीण भागात दिसत आहे.

आताच महाग; पुढे काय ?

उन्हाच्या सुरुवातीलाच लिंबू एवढे महाग झाले आहे. आणखी कडक उन्हाळा बाकी आहे. ऊन वाढले तर नंतर लिंबाचा भाव दीडशे ते दोनशे रुपये किलोच्या घरात जाऊ शकतो, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे.

७० रुपये किलोप्रमाणे लिंबू बाजारात

सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. बाजारपेठेत मध्यंतरी २५ ते ४० रुपये किलो लिंबाला बाजारभाव होता; पण आता ७० रुपये किलोचा भाव बाजारात मिळत आहे.

लिंबाच्या दरात उसळी कशामुळे?

थंडीच्या दिवसांत लिंबाला एवढा भाव किंवा मागणी नसते; पण उन्हाची चाहूल लागताच सरबत, उसाचा रस, रोजच्या आहारात मागणी वाढल्याने लिंबाच्या दराने उसळी घेल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांसाठी लिंबू शेती एटीएम

माल जरी कमी निघत असला तरी भाव चांगला मिळतोय. इतर पिकापेक्षा लिंबूशेती फायदेशीर असून, दररोज हातात पैसा येत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी लिंबू शेती एटीएम असल्याचे चोंभानिमगाव येथील शेतकरी रेवणनाथ राऊत यांनी सांगितले.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील लिंबू आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/03/2026
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2580001300010500
राहता---क्विंटल7700080007500
पुणे-मोशीलोकलक्विंटल47100001000010000
28/02/2026
अकलुज---क्विंटल12300050004000
कोल्हापूर---क्विंटल113500075006000
अहिल्यानगर---क्विंटल18200075004750
जळगाव---क्विंटल45150035002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल42600080007000
राहूरी---क्विंटल2500070006000
श्रीरामपूर---क्विंटल14300040003550
राहता---क्विंटल4200080005000
नाशिकहायब्रीडक्विंटल20500070006000
सोलापूरलोकलक्विंटल2880075004000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60550065006000
पुणे-मोशीलोकलक्विंटल638000100009000
नागपूरलोकलनग120700075007375
भुसावळलोकलक्विंटल4800090009000
27/02/2026
अकलुज---क्विंटल10300050004000
जळगाव---क्विंटल9600090007500
श्रीरामपूर---क्विंटल22300040003550
नाशिकहायब्रीडक्विंटल18500075007000
कल्याणहायब्रीडक्विंटल3500060005500
धाराशिवकागदीक्विंटल8200060004000
सोलापूरलोकलक्विंटल3090080003500
पुणेलोकलक्विंटल38540024001800
पुणे-मोशीलोकलक्विंटल38100001000010000
जुन्नर - नारायणगावलोकलक्विंटल8100090005000
मुंबईलोकलक्विंटल181200030002500
भुसावळलोकलक्विंटल3750080008000
हिंगणालोकलक्विंटल17000110008750

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई

Web Title : गर्मी बढ़ने से नींबू के दाम ₹70 तक पहुंचे, मांग बढ़ी।

Web Summary : गर्मी बढ़ने के कारण नींबू की मांग बढ़ने से कीमतें ₹70 तक पहुंच गईं। जूस विक्रेताओं, होटलों और घरों से मांग में वृद्धि हुई है। आपूर्ति में कमी के कारण कीमतें बढ़ रही हैं, और गर्मी बढ़ने पर ₹150-200 प्रति किलो तक बढ़ने की आशंका है। किसान नींबू की खेती को फायदे का सौदा मानते हैं।

Web Title : Lemon prices soar to ₹70 as summer heat increases demand.

Web Summary : Lemon prices surged to ₹70 due to rising demand from juice vendors, hotels, and households amid increasing temperatures. Supply shortages are driving prices up, with predictions of further increases to ₹150-200 per kg as summer intensifies. Farmers see lemon farming as a profitable venture.