Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात केशर आंब्याची आवक सुरु; वाचा गोल्डन केशर आंब्याला प्रतिकिलो काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:54 IST

kesar mango bajar bhav हापूसचा हंगाम संपत आला असतानाच केशर आंबा बाजारात दाखल होत आहे. मार्केट फळबाजारात तब्बल ७५० ग्रॅमचा केशर दाखल झाला.

पुणे : हापूसचा हंगाम संपत आला असतानाच केशर आंबाबाजारात दाखल होत आहे. मार्केट फळबाजारात तब्बल ७५० ग्रॅमचा केशर दाखल झाला.

मोठ्या आकाराचा व ताजा माल असलेल्या या फळाने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. मार्केट यार्डातील फळांचे व्यापारी युवराज काची यांच्या गाळ्यावर प्रथमच केशर आंब्यामध्ये 'गोल्डन' नावाची व्हरायटी दाखल झाली.

हा केशर आंबा उत्तम दर्जाचा असून, शेतकऱ्यांनी अतिशय मनोभावे या फळांची जोपासना केली आहे. हे मोठ्या आकाराचे फळ पाहण्यासाठी व्यापाऱ्यांसह ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.

केशरला प्रति किलो उच्चांकी १२१ रुपये दर मिळाला. बाजारात काल सुमारे ३ टन केशर आंब्याची आवक झाली. त्यातील १४ ट्रेमध्ये ७५० ग्रॅमचे फळ होते.

यामध्ये प्रति किलोला उच्चांकी १२१ रुपये दर तर कमी आकाराच्या फळाला १०० रुपये, तर लहान आकाराच्या फळाला ७५ रुपये दर मिळत आहे

या केशर आंब्याची आटपाडी (जि. सांगली) येथील शेतकरी सुखदेव चव्हाण यांच्या शेतातून आवक झाली. चव्हाण यांनी मेहनतीने केशर आंबा वाढवला आहे. या फळांना उच्चांकी दर मिळाला. या आंब्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. या आंब्याला परेश शहा यांनी उच्चांकी भाव देऊन केशर आंब्याची खरेदी केली. - युवराज काची, आंबा व्यापारी, मार्केटयार्ड

अधिक वाचा: खरीप हंगाम पिक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल लागला; वाचा तुमच्या जिल्ह्यातील विजेत्या शेतकऱ्यांची यादी

English
हिंदी सारांश
Web Title : Kesar Mangoes Arrive in Market; Golden Variety Fetching High Price

Web Summary : Kesar mangoes have arrived in Pune, fetching ₹121 per kilo. The 'Golden' variety, weighing 750 grams, is drawing crowds. Three tons arrived, with farmer Sukhdev Chavan receiving top prices for his high-quality fruit.
टॅग्स :आंबाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेशेतकरीसांगली