Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ८३ हजार आंबा पेट्यांची आवक; वाचा हापूसबरोबरच इतर आंब्यांना काय मिळतोय दर?

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ८३ हजार आंबा पेट्यांची आवक; वाचा हापूसबरोबरच इतर आंब्यांना काय मिळतोय दर?

Arrival of 83 thousand boxes of mangoes on the occasion of Akshaya Tritiya; Read what price is being paid for other mangoes besides Hapus? | अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ८३ हजार आंबा पेट्यांची आवक; वाचा हापूसबरोबरच इतर आंब्यांना काय मिळतोय दर?

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ८३ हजार आंबा पेट्यांची आवक; वाचा हापूसबरोबरच इतर आंब्यांना काय मिळतोय दर?

akshay tritiya mango market अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे.

akshay tritiya mango market अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे.

नवी मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे.

शुक्रवारी एकूण ८२ हजार ६०८ पेट्यांची आवक झाली असून, त्यामध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या ५१ हजार ३८८ पेट्यांचा समावेश असून इतर ३१ हजार २२० पेट्यांची आवक झाली.

यावर्षी हवामानाच्या फटक्यामुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. गुढीपाडव्यालाही फक्त २४ हजार पेट्यांची आवक झाल्याने ग्राहकांना हापूसचा आस्वाद घेता आला नव्हता.

मात्र, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बाजारात आवक वाढू लागल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सध्या आवक वाढत असल्याने दरातही काही प्रमाणात नरमाई दिसून येत आहे.

२४ एप्रिल ते १० मे दरम्यान कोकणातील हापूसची आवक अधिक वाढण्याची शक्यता असून, मे अखेरपर्यंत हंगाम सुरू राहणार आहे.

असे आहेत दर, किलोमध्ये (हापूस डझन)
आंबा : होलसेल - किरकोळ

◼️ हापूस : ४०० ते १००० - ८०० ते २०००
◼️ बदामी : ६० ते ८० - १०० ते १५०
◼️ लालबाग : ५० ते ८० - १०० ते १५०
◼️ तोतापुरी : ४० ते ६०- ८० ते १००
◼️ केसर : १०० ते २०० - १५० ते ३००

परराज्यातूनही आवक
◼️ एप्रिल अखेरपासून गुजरातमधील आंबाही बाजारात येण्याची शक्यता आहे.
◼️ सध्या कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधूनही आंब्याची आवक सुरू आहे.
◼️ त्यामुळे ग्राहकांना हापूसबरोबर बदामी, लालबाग, तोतापुरी आणि केसर अशा विविध प्रकारांचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

अधिक वाचा: बाजारात शाळू ज्वारीपेक्षा मालदांडी ज्वारीला अधिक पसंती; वाचा प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?

Web Title : अक्षय तृतीया: 83,000 आमों की पेटियाँ आईं; हापुस और अन्य के दाम

Web Summary : अक्षय तृतीया के लिए मुंबई में आमों की आवक बढ़ी, जिसमें 51,388 हापुस सहित 82,608 पेटियाँ शामिल हैं। आपूर्ति बढ़ने से कीमतें थोड़ी कम हैं। मई तक हापुस की आपूर्ति चरम पर होगी, जिसके बाद गुजरात, कर्नाटक और तमिलनाडु से आम मिलेंगे।

Web Title : Akshaya Tritiya: 83,000 Mango Crates Arrive; Prices of Hapus & Others

Web Summary : Mango arrivals surge in Mumbai for Akshaya Tritiya, with 82,608 crates, including 51,388 Hapus. Prices are slightly lower due to increased supply. Hapus supply will peak by May, joined by mangoes from Gujarat, Karnataka, and Tamil Nadu, offering diverse options.