Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी; प्रति क्विंटल काय दर केला निश्चित?

हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी; प्रति क्विंटल काय दर केला निश्चित?

Approval given to procurement centers to purchase gram at guaranteed price; What price per quintal has been decided? | हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी; प्रति क्विंटल काय दर केला निश्चित?

हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी; प्रति क्विंटल काय दर केला निश्चित?

harbhara kharedi शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात चणा/हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

harbhara kharedi शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात चणा/हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

अहिल्यानगर : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात चणा/हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी एकूण १० खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. 

संबंधित केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने शेतकरी नोंदणी १ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.

हंगाम २०२४-२५ करिता चणा हमीभाव प्रति क्विंटल ५ हजार ८७५ रुपये निश्चित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी चालू हंगामातील सर्वसाधारण सरासरी दर्जाचा चणा खरेदी केंद्रावर आणावा. एन.सी.सी.एफ. यांनी निर्धारित केलेल्या निर्देशानुसार चण्याची तपासणी करण्यात येणार आहे.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे खरेदीसाठी बोलावण्यात येईल. एसएमएसमध्ये नमूद केलेल्या तारखेलाच शेतमाल केंद्रावर आणणे बंधनकारक राहील, असेही कळविण्यात आले आहे.

अधिक वाचा: मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला 'हा' साखर कारखाना देणार टनाला ३ हजार ५०० रुपये पहिली उचल

Web Title: Approval given to procurement centers to purchase gram at guaranteed price; What price per quintal has been decided?