पुणे : यंदाचा लांबलेला मॉन्सून आणि परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम यामुळे विविध फळबागांना फटका बसला आहे.
यामध्ये नागपूर संत्र्याचा हंगामाला फटका बसला असून, पावसाने संत्र्यांची फळगळ आणि माशीच्या प्रादुर्भावामुळे ५० टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
परिणामी बाजारातील आवक आणि हंगामही लवकर जाण्याची भिती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड येथील फळ बाजारात सध्या ७०० पेट्यांची आवक होत आहे.
यावेळी ८ डझन ते २० डझनच्या पेटीला सुमारे ३०० ते ११०० रूपये दर असल्याची माहिती नागपूर संत्र्यांचे प्रमुख आडतदार करण जाधव यांनी दिली.
हंगाम अडचणीत माशीच्या प्रादुर्भावामुळे◼️ संत्र्यांचा दर्जा आणि टिकवण क्षमता कमी झाली असून, त्याला दोन दिवसांतच पाणी सुटायला लागले आहे.◼️ यामुळे तातडीने माल विक्री करावी लागत आहे. तर पाणी सुटत असल्याने खरेदीदार पण कमी खरेदी करत आहे.◼️ तसेच पावसाने आणि फळांना ऊन न मिळाल्याने फळांमध्ये रंग, गोडी उतरली नसल्याने आंबटपणा वाढला आहे.
असे आहेत दरडझन - दर (रु.)९ ते १० - ११००८ ते ११ - १०००१२ डझन - ८००१४ डझन - ७००२०० नग - ५००३०० नग - ३००
सततच्या पावसाने फळांची गळ होत असून, माशीचाही प्रादुर्भाव झाल्याने हंगाम अडचणीत आला आहे. यामुळे आवक कमी येत असून, तीन महिने चालणारा हंगाम दीड महिन्यातच संपण्याची भीती आहे. - करण जाधव, संत्री व्यापारी
अधिक वाचा: कर्नाटकातून पांढऱ्या कांद्याच्या बाराशे पिशव्यांची सोलापूर बाजारात आवक; वाचा कसा मिळतोय दर?
Web Summary : Late monsoon rains damaged Nagpur orange crops, reducing Pune market arrivals. Fruit drop and pest infestations led to a 50% loss. Prices range from ₹300 to ₹1100 per box, but quality is declining due to water release and lack of sweetness. The season is expected to end early.
Web Summary : देर से मानसून की बारिश ने नागपुर संतरे की फसल को नुकसान पहुंचाया, जिससे पुणे बाजार में आवक कम हो गई। फल झड़ने और कीटों के संक्रमण से 50% नुकसान हुआ। कीमतें ₹300 से ₹1100 प्रति पेटी तक हैं, लेकिन पानी निकलने और मिठास की कमी के कारण गुणवत्ता घट रही है। सीजन जल्दी खत्म होने की उम्मीद है।