नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. सोमवारी १ लाख १३ हजार पेट्यांमधून तब्बल २५३ टन आंब्याची आवक झाली आहे.
बाजारभावही नियंत्रणात येण्यास सुरुवात झाल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.
सोमवारी पहिल्यांदा एक लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण झाला. बाजारात कोकणातून ७९ हजार ७४६ पेट्या व इतर राज्यांमधून ३३ हजार १६० पेट्यांची आवक झाली आहे.
गत आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये ३०० ते १२०० रुपये डझन दराने आंबा विकला गेला होता. आता हेच दर २०० ते ८०० रुपये डझन झाले आहेत.
बाजार समितीमध्ये सोमवारी दाखल झालेला आंबा आठवड्याच्या शेवटपर्यंत पिकून ग्राहकांना उपलब्ध होईल. यामुळे पुढील आठवड्यात दर अजून कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अधिक वाचा: एक पेटी आंबा तयार होण्यासाठी शेतकऱ्याचा किती खर्च होतो? वाचा सविस्तर