Lokmat Agro >शेतशिवार > आईच्या मदतीने राहुल यांनी दहा गुंठे वांग्यातून मिळवले दीड लाखाचे उत्पन्न

आईच्या मदतीने राहुल यांनी दहा गुंठे वांग्यातून मिळवले दीड लाखाचे उत्पन्न

With the help of his mother, Rahul earned an income of Rs 1.5 lakh from ten gunthas of brinjal | आईच्या मदतीने राहुल यांनी दहा गुंठे वांग्यातून मिळवले दीड लाखाचे उत्पन्न

आईच्या मदतीने राहुल यांनी दहा गुंठे वांग्यातून मिळवले दीड लाखाचे उत्पन्न

कापशीतील शेतकरी राहुल कदम आणि त्यांची आईने अवघ्या १० गुंठ्यातील ३०० वांग्याच्या झाडापासून पाच महिन्यात दीड टन उत्पादन घेतले.

कापशीतील शेतकरी राहुल कदम आणि त्यांची आईने अवघ्या १० गुंठ्यातील ३०० वांग्याच्या झाडापासून पाच महिन्यात दीड टन उत्पादन घेतले.

शेअर :

Join us
Join usNext

सूर्यकांत निंबाळकर
आदर्की: कापशीतील शेतकरी राहुल कदम आणि त्यांची आईने अवघ्या १० गुंठ्यातील ३०० वांग्याच्या झाडापासून पाच महिन्यात दीड टन उत्पादन घेतले. आंतर पिकासह एकूण दीड लाख रुपयांचे ही उत्पन्न मिळवले आहे.

कापशी येथील तरुण शेतकरी राहुल सोमनाथ कदम यांनी जानेवारी महिन्यात जमिनीची मशागत करून शेणखत टाकून सरीवर एक हजार वांगी रोपाची लागवड केली.

मात्र, ७०० रोपे जळाली. पण खचून न जाता त्यांनी मेथी, चाकवत, कोथिंबीर यांचे अंतर पीक घेऊन ४० दिवस भाजीपाला विकून पैसे कमावले.

४५ दिवसांनी वांग्याचा पहिला तोडा केला. आठवडी बाजारादिवशी दोन सऱ्या तोडल्यानंतर सुमारे २५० किलो वांगी म्हणजे पाच कॅरेट वांगी मिळाली.

ही वांगी आदर्की बुद्रूक, आळजापूर, बिबी, पिंपोडे बुद्रूक, वाठार स्टेशन येथील आठवडे बाजारात विकण्यात आली.

नोकरी करुन पार्ट टाईम शेती करत आहे. वांग्याची एक हजार रोपे लावली होती. पण, आळवणीचे प्रमाण व वातावरणातील बदलाने अंदाजे ७०० रोपे जळाली. त्याजागी भाजीपाला घेतला होता. वांग्याचे पाच महिने उत्पादन सुरु आहे. अजून पाच महिने उत्पादन मिळणार आहे. हे पिक फायदेशीर ठरत आहे. - राहुल कदम, शेतकरी

अधिक वाचा: पाणंद शेतरस्ते आता कायमस्वरूपी रेकॉर्डवर येणार; भुमी अभिलेख विभागाने घेतला 'हा' निर्णय?

Web Title: With the help of his mother, Rahul earned an income of Rs 1.5 lakh from ten gunthas of brinjal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.