कोल्हापूर जिल्ह्याच्या आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याने यंदा गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३५२५ रुपये एकरकमी विनाकपात पहिली उचल जाहीर केली.
'दालमिया'ने उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवल्याने ऊसदराचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, तसेच यंदा बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टासाठी ऊस उत्पादकांनी सहकार्य करण्याचे आवाहन युनिट हेड संतोष कुंभार यांनी केले.
दालमिया प्रशासन प्रत्येक हंगामात उसाची पहिली उचल ही कायम उच्चांकी जाहीर करत आहे. ऊस बिल किंवा तोडणी-ओढणीची बिले वेळेत देत आहे. ४८ तासांत उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची किमया प्रशासनाने केली आहे. साखर उद्योगातील बदलत्या धोरणाचा फटका साखर कारखानदारी बसत आहे.
शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे कसोटीचे ठरत असताना 'दालमिया' प्रत्येक वर्षी उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखत शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. गत हंगामात ३४४२ रुपये अंतिम दर देऊन विभागात उच्चांक केला होता. यावर्षी पहिली उचल विनाकपात ३५२५ रुपये जाहीर करून उंच्चाकी ऊस दर जाहीर केला आहे.
याप्रसंगी जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी, एचआर प्रमुख सुहास गुडाळे, असिस्टंट शेती अधिकारी शिवप्रसाद देसाई, सहायक ऊस विकास अधिकारी किशोर लेंगरे आदींसह खाते प्रमुख उपस्थित होते.
सहकार्य करावे
यंदा बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टासाठी ऊस उत्पादकांनी सहकार्य करण्याचे आवाहन युनिट हेड संतोष कुंभार यांनी केले.
सरासरी साखर उताऱ्यावर दुसरा हप्ता..
• ऊस बिल देण्याचे फिलगुड म्हणून जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यातून दालमिया कारखान्याला शेतकरी ऊस पाठवत आहेत. हे त्याचेच फलित आहे. शासनाच्या धोरणानुसार उसाच्या एफआरपीची पहिली उचल हंगामात, नंतर सरासरी साखर उताऱ्यावर आधारभूत असणारा दुसरा हप्ता दिला जात आहे.
• दालमिया कारखान्याकडून यंदाची पहिली उचल प्रतिटन ३५२५ रुपये विनाकपात देणार आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्व ऊस दालमिया कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, तसेच उच्चांकी दराचा लाभ घेण्याचे आवाहन संतोष कुंभार यांनी केले.
