Lokmat Agro >शेतशिवार > Winter Health Tips : हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणाऱ्या 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

Winter Health Tips : हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणाऱ्या 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

Winter Health Tips: Include these foods in your diet that keep your body warm in winter | Winter Health Tips : हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणाऱ्या 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

Winter Health Tips : हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणाऱ्या 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

Winter Health Tips : या थंड महिन्यात शरीराला आजाराचा सामना करण्यासाठी अतिरिक्त संरक्षणाची आवश्यकता असते. त्यामुळे हिवाळ्यात आतून ऊबदार ठेवणाऱ्या आहाराचा समावेश करा, असा सल्ला आहारतज्ज्ञानी दिला आहे.

Winter Health Tips : या थंड महिन्यात शरीराला आजाराचा सामना करण्यासाठी अतिरिक्त संरक्षणाची आवश्यकता असते. त्यामुळे हिवाळ्यात आतून ऊबदार ठेवणाऱ्या आहाराचा समावेश करा, असा सल्ला आहारतज्ज्ञानी दिला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हिवाळ्यात मानवी शरीराची चयापचय आणि ऊर्जा पातळी बदलते. आहार बदलतो आणि हिवाळ्यात उबदार वाटण्यासाठी अधिक खाण्याची इच्छा निर्माण होते.

या थंड महिन्यात शरीराला आजाराचा सामना करण्यासाठी अतिरिक्त संरक्षणाची आवश्यकता असते. त्यामुळे हिवाळ्यात आतून ऊबदार ठेवणाऱ्या आहाराचा समावेश करा, असा सल्ला आहारतज्ज्ञानी दिला आहे.

हिवाळ्यात मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली विकसित करता येते. जी आपल्याला पुढील ऋतूंचा सामना करण्यासाठी मदत करते. आहारतज्ज्ञ स्वाती अवस्थी यांनी सांगितले, या हंगामात फळांचे आणि भाज्यांचे भरपूर सेवन करायला हवे.

हिवाळ्यात असे काही सुपर फूड्स आहेत जे केवळ आरोग्यदायीच नाहीत, तर चवदार आणि शरीर आतून ऊबदार ठेवण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषण घटक पुरविण्यास मदत करतात. यात बाजरा, रताळ, खजूर, लिंबूवर्गीय फळे, सुका मेवा, डाळिंब, ब्रोकालीसारख्या भाज्यांचा समावेश फायदेशीर ठरतो..

बाजरा

बाजरा हे गहू किंवा तांदळापेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले धान्य आहे. यामध्ये मॅग्नेशियम, हृदयासाठी उत्तम कोलेस्टेरॉल नियंत्रित करणारा आणि शरीराला उपयुक्त असलेले धान्य आहे. बाजरा ग्लुटेन फ्री असतो. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक आणि तांबेसारखी खनिजे पदार्थ असतात.

रताळे

इतर प्रकारच्या कंदमुळापेक्षा रताळ्यामध्ये दुप्पट फायबर्स असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी-६ ची महत्त्वाची पोषणतत्त्वे असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवून मळमळ कमी करण्यास मदत करतात. हिवाळ्यात शरीर ऊबदार राहण्यासाठी रताळे भाजून, बेक करून किंवा इतर कोणत्याही प्रकारे खाल्ले जाऊ शकतात.

खजूर

खजुराच्या नियमित सेवनाने शरीर ऊबदार राहते. खजुरात लोह, प्रोटिन, कॅल्शियम आणि अनेक इतर जीवनसत्त्वांचे भरपूर प्रमाण असते. जे चांगल्या आरोग्यासोबतच शरीराला रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.

लिंबूवर्गीय फळे

लिंबूवर्गीय फळे शरीराला पोषक प्रमाणात व्हिटॅमिन-सी चा पुरवठा करतात. जे आपली रोगप्रतिकारक प्रणाली बळकट करतात. या फळांमध्ये फायबर्सदेखील मोठ्या प्रमाणात असतात.

सुका मेवा

बदाम आणि अक्रोड हिवाळ्यातील सर्वोत्तम खाद्यपदार्थ आहेत. जे तुमच्या स्नायूंच्या प्रणालीला आणि हृदयाच्या आरोग्याला मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅट्स असतात. जी इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात.

डाळिंब

डाळिंब हे अँटिऑक्सिडन्ट्स आणि पोषणतत्त्वांनी भरलेले असते. डाळिंब हे व्हिटॅमिन के आणि फायबर्सचे उत्तम स्रोत असतात. यात व्हिटॅमिन-सी चे प्रमाण ४८ टक्के असते. डाळिंबातील अँटिऑक्सिडन्ट्स कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

ब्रोकोली आणि फुलकोबी

या कूसिफेरस भाज्या हिवाळ्ळ्यात रोगप्रतिकारकशक्तीसाठी महत्त्वाच्या आहेत, कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत होते. हिवाळ्ळ्यात कोबी पराठे, सूप उत्तम आहार ठरू शकतो.

हेही वाचा : Health Benefits Of Amaranth : अमरंथच्या पर्णांचे पोषणतत्त्व आणि आरोग्यदायी फायदे

Web Title: Winter Health Tips: Include these foods in your diet that keep your body warm in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.