Lokmat Agro >शेतशिवार > अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची अडचण होणार कमी? कृषी यांत्रिकीकरण योजनेत जीएसटीच्या अनुषंगाने होणार 'हा' बदल

अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची अडचण होणार कमी? कृषी यांत्रिकीकरण योजनेत जीएसटीच्या अनुषंगाने होणार 'हा' बदल

Will the difficulties of the farmers who have applied be reduced? 'This' change will be made in the agricultural mechanization scheme in line with GST | अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची अडचण होणार कमी? कृषी यांत्रिकीकरण योजनेत जीएसटीच्या अनुषंगाने होणार 'हा' बदल

अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची अडचण होणार कमी? कृषी यांत्रिकीकरण योजनेत जीएसटीच्या अनुषंगाने होणार 'हा' बदल

krishi yantra kharedi yojana कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना-कृषी यांत्रिकीकरण या योजनांची अंमलबजावणी Maha DBT पोर्टलवरद्वारे केली जात आहे.

krishi yantra kharedi yojana कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना-कृषी यांत्रिकीकरण या योजनांची अंमलबजावणी Maha DBT पोर्टलवरद्वारे केली जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जीएसटी GST च्या दरांमध्ये बदल केल्याने Maha DBT पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजना अंमलबजावणीच्या विविध स्तरावरील अर्ज रद्द होतील का अशी शंका होती पण आता ते अर्ज रद्द होणार नाहीत.

कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना-कृषी यांत्रिकीकरण या योजनांची अंमलबजावणी Maha DBT पोर्टलवरद्वारे केली जात आहे.

सदर योजनेत लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १० दिवस तसेच पूर्वसंमती प्रदान केल्यानंतर यंत्रे/औजारे खरेदी करून देयके अपलोड करण्यासाठी ३० दिवसांचा अवधी लाभार्थ्यास दिला जात आहे.

त्याप्रमाणे संदेश लाभार्थ्यांना जात आहे. सद्यस्थितीत केंद्र शासनाने GST च्या दरांमध्ये बदल केल्याने शेती यंत्रे व औजारे यांच्या किमतीमध्ये घट होणार आहे.

सदर सुधारणा २२ सप्टेंबर, २०२५ पासून लागू होत असल्याने क्षेत्रीय स्तरावरून यंत्रे व औजारे खरेदीसाठी कालावधी वाढवून देण्याकरिता लाभार्थ्यांकडून मागणी होत आहे.

तरी सदर मागणीनुसार कृषी यांत्रिकीकरण योजनांमधील निवड झालेले अर्ज पुढील आदेशापर्यंत कोणत्याही स्तरावरून परस्पर रद्द करण्यात येवू नये. असे संचालक (कृषी अभियांत्रिकी संचालनालय) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर

Web Title: Will the difficulties of the farmers who have applied be reduced? 'This' change will be made in the agricultural mechanization scheme in line with GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.