Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांची यंदा सुद्धा राहणार का मका, कापूस अन् सोयाबीनला पसंती? वाचा काय सांगतोय कृषी विभागाचा अंदाज

शेतकऱ्यांची यंदा सुद्धा राहणार का मका, कापूस अन् सोयाबीनला पसंती? वाचा काय सांगतोय कृषी विभागाचा अंदाज

Will farmers continue to prefer maize, cotton and soybean this year too? Read what the Agriculture Department's forecast says | शेतकऱ्यांची यंदा सुद्धा राहणार का मका, कापूस अन् सोयाबीनला पसंती? वाचा काय सांगतोय कृषी विभागाचा अंदाज

शेतकऱ्यांची यंदा सुद्धा राहणार का मका, कापूस अन् सोयाबीनला पसंती? वाचा काय सांगतोय कृषी विभागाचा अंदाज

कृषी विभागाकडून अवकाळीच्या पंचनाम्यासोबत आता खरीप हंगामाच्या पेरणीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामासाठी ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

कृषी विभागाकडून अवकाळीच्या पंचनाम्यासोबत आता खरीप हंगामाच्या पेरणीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामासाठी ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे उन्हाची तीव्रता अधिक असताना मार्च आणि एप्रिल महिन्यात सातत्याने अवकाळी पाऊस पडतो आहे.

कृषी विभागाकडून अवकाळीच्या पंचनाम्यासोबत आता खरीप हंगामाच्या पेरणीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून मका, कापूस अन् सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती दिसून येते.

मागील काही वर्षात जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ५ लाख ६२ हजार सरासरी क्षेत्र असताना यंदा जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या साडेसात लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या क्षेत्रासाठी ९२ हजार ४६३ क्विंटल बियाणे शासकीय व खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह उत्तर आणि पूर्व भारतातील तापमान वाढले आहे. अनेक भागांमध्ये तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असणार असून, भारतीय हवामान विभागाने तापमान वाढवण्याचा इशारा दिला आहे.

९२ हजार क्विंटल बियाणे मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपासाठी ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तर हंगामासाठी ९२ हजार ४६३ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात येणार असून यात २७ हजार ५३५ हेक्टर शासकीय तर ६४ हजार ९२८ हेक्टरवरील बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध करण्यात येणार आहे.

पीकनिहाय नियोजित क्षेत्र

पिके क्षेत्र (हेक्टर)
भात २१ हजार
बाजरी६७ हजार
मका१ लाख १७ हजार
तूर७७ हजार
उडीद ७६ हजार
मूग५२ हजार
सोयाबीन१ लाख ९० हजार
कापूस१ लाख ५६ हजार

मे महिन्यात मान्सून येणार

युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन होऊ शकते. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये २७ ते २९ मे दरम्यान भारतात मान्सून दाखल झाल होता. यावर्षीही मे च्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दक्षिण भारतात दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

Web Title : मानसून पूर्वानुमानों के बीच मक्का, कपास, सोयाबीन को किसानों की प्राथमिकता जारी

Web Summary : एल नीनो और बेमौसम बारिश की चिंताओं के बावजूद, अहिल्यायनगर के किसानों द्वारा इस खरीफ सीजन में मक्का, कपास और सोयाबीन को पसंद किए जाने की संभावना है। कृषि विभाग ने 7.56 लाख हेक्टेयर की योजना बनाई है, जिसमें 92,463 क्विंटल बीज उपलब्ध हैं। मानसून के जल्दी आने की उम्मीद है।

Web Title : Farmers' Preference for Maize, Cotton, Soybean Continues Amid Monsoon Forecasts

Web Summary : Ahlilyanagar farmers likely favor maize, cotton, and soybean this Kharif season, despite El Nino and unseasonal rain concerns. The agriculture department plans for 7.56 lakh hectares, with 92,463 quintals of seeds available. Early monsoon arrival is expected.