Lokmat Agro >शेतशिवार > विदर्भाच्या 'या' वनपरिक्षेत्रांमध्ये आज होणार वन्यप्राणी गणना; तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची घेण्यात येईल नोंद

विदर्भाच्या 'या' वनपरिक्षेत्रांमध्ये आज होणार वन्यप्राणी गणना; तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची घेण्यात येईल नोंद

Wildlife census to be conducted today in 'these' forest areas of Vidarbha; Record of herbivores and carnivores will be taken | विदर्भाच्या 'या' वनपरिक्षेत्रांमध्ये आज होणार वन्यप्राणी गणना; तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची घेण्यात येईल नोंद

विदर्भाच्या 'या' वनपरिक्षेत्रांमध्ये आज होणार वन्यप्राणी गणना; तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची घेण्यात येईल नोंद

Wildlife Census : अकोला वनपरिक्षेत्रांमध्ये येत्या सोमवार, दि. १२ मे रोजी पौर्णिमेनिमित्त वन्यप्राणी गणना पार पडणार आहे. यामध्ये वाइल्ड लाइफ क्षेत्रातील पाच वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे.

Wildlife Census : अकोला वनपरिक्षेत्रांमध्ये येत्या सोमवार, दि. १२ मे रोजी पौर्णिमेनिमित्त वन्यप्राणी गणना पार पडणार आहे. यामध्ये वाइल्ड लाइफ क्षेत्रातील पाच वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अकोला जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रांमध्ये येत्या सोमवार, दि. १२ मे रोजी पौर्णिमेनिमित्त वन्यप्राणी गणना पार पडणार आहे. यामध्ये वाइल्ड लाइफ क्षेत्रातील पाच वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे.

संबंधित ठिकाणी नैसर्गिक तळे, जलाशय, कृत्रिम पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असून, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बारकाईने निरीक्षण केले जाणार आहे.

ही गणना दि. १२ मे सायंकाळी ६ वाजता सुरू होऊन १३ मे रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत चालेल. यामध्ये तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची नोंद घेण्यात येईल. वन्यप्राण्यांना न जाणवता निरीक्षण करता यावे यासाठी उंच ठिकाणी मचाण बसवण्यात येणार आहेत.

अकोला वनक्षेत्रातील काटेपूर्णा अभयारण्य, नरनाळा आणि वाइल्ड लाइफ क्षेत्रात ही गणना होणार आहे. सिंचन प्रकल्पासारख्या जलस्रोतांवरही लक्ष केंद्रित केले जाईल. याप्रक्रियेत वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, वनपाल, हंगामी मजूर सहभागी होणार आहेत.

प्राणी गणनेची जय्यत तयारी

• यंदा वाघ, बिबट, नीलगाय, काळवीट, रानडुक्कर, साळिंदर, पंगोलीन यांची उपस्थिती नोंदवली जाईल. विशेषतः वाघांची आहेत आहे का, याचा अंदाजही या गणनेतून मिळणार आहे.

• अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, नरनाळा आदी अभयारण्यात मचाण उभारण्यात आले असून, प्राणी गणनेसाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

Web Title: Wildlife census to be conducted today in 'these' forest areas of Vidarbha; Record of herbivores and carnivores will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.