Lokmat Agro >शेतशिवार > कापसाच्या क्षेत्रात घट तर 'या' जिल्ह्याच्या मका क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ

कापसाच्या क्षेत्रात घट तर 'या' जिल्ह्याच्या मका क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ

While cotton acreage has decreased, this district's maize acreage has seen a record increase this year. | कापसाच्या क्षेत्रात घट तर 'या' जिल्ह्याच्या मका क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ

कापसाच्या क्षेत्रात घट तर 'या' जिल्ह्याच्या मका क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ

Maize Crop : खरीप हंगामात मक्याची विक्रमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख ३९ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे, जो सरासरी पेरणी क्षेत्राच्या तब्बल १५० टक्के आहे.

Maize Crop : खरीप हंगामात मक्याची विक्रमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख ३९ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे, जो सरासरी पेरणी क्षेत्राच्या तब्बल १५० टक्के आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात मक्याची विक्रमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख ३९ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे, जो सरासरी पेरणी क्षेत्राच्या तब्बल १५० टक्के आहे. यामुळे मका हे जिल्ह्यातील सर्वाधिक पेरणी झालेले पीक ठरले आहे. याउलट, कापसाच्या क्षेत्रात मात्र मोठी घट दिसून येत आहे.

जिल्ह्यात कापसाची सरासरी पेरणी ५ लाख ४६ हजार ९३३ हेक्टर असताना, प्रत्यक्षात केवळ ४ लाख ५ हजार ८१६ हेक्टरवरच पेरणी झाली आहे, जी सरासरीच्या ७४.२० टक्के आहे.

शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तुरीला चांगली पसंती दिली आहे. सोयाबीनची पेरणी सरासरीच्या ९४.७२ टक्के म्हणजे १८ हजार ४६८ हेक्टरवर झाली आहे, तर तुरीची पेरणी सरासरीच्या १०८ टक्के झाली असून, एकूण १२ हजार ९६६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

मक्याचे क्षेत्र का वाढले..?

मक्याला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. चारा म्हणून मक्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते, ज्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळतो. मक्याचे पीक साधारणपणे २० दिवसांत तयार होते. यामुळे शेतकऱ्यांना एकाच वर्षात एकापेक्षा जास्त पिके घेण्याची संधी मिळते. कापसाच्या तुलनेत मक्याला कमी पाण्याची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता अनिश्चित असते, तेथे मका अधिक सुरक्षित पर्याय ठरतो.

कापसाचे क्षेत्र का घटले..?

कापसाला मक्याच्या तुलनेत पाणी जास्त लागते. जिल्ह्यातील बरेच क्षेत्र कोरडवाहू आहे. अनियमित पाऊस किंवा दुष्काळामुळे कापसाचे पीक धोक्यात येते. बोंडअळीची समस्या कायम असते. कापूस लागवडीसाठी मजूर आणि बियाणे, खतांवर मोठा खर्च येतो. कापसाच्या बाजारभावात अनेकदा चढ-उतार दिसून येतात. शेतकऱ्यांना उत्पन्नाबाबत अनिश्चितता वाटते.

जळगाव जिल्ह्यातील एकूण स्थिती

प्रस्तावित पेरणी - ०७ लाख ४० हजार ५३६ 
झालेली पेरणी - ०६ लाख ६९ हजार ९२४ 
एकूण टक्केवारी - ८१.९६ टक्के 

तालुकानिहाय पेरणीची स्थिती..

तालुका सर्वसाधारण क्षेत्र खरीप पेरणी क्षेत्र टक्केवारी
जळगाव ५० हजार ४६३ ३७ हजार १९८ ७३ टक्के 
भुसावळ २५ हजार ७९८ २५ हजार ५७९ ९१ टक्के 
बोदवड ३३ हजार ५७५ ३० हजार ३६१ ९० टक्के 
यावल ४० हजार ४३४ २८ हजार ४५३  ७० टक्के 
रावेर २९ हजार ३१८ १८ हजार ८५७ ६४ टक्के 
मुक्ताईनगर २८ हजार ४०८ २५ हजार ५१४ ८९ टक्के 
अमळनेर ६६ हजार २५९ ४० हजार ५७९   ६१ टक्के 
चोपडा ५८ हजार २७८ ४९ हजार ८१७ ८५ टक्के 
एरंडोल ३८ हजार १ ३४ हजार २०३ ९० टक्के 
धरणगाव ४१ हजार ५५९ ३७ हजार ३८० ८९ टक्के 
पारोळा ५१ हजार ८१२ ३७ हजार ५६६ ७२ टक्के 
चाळीसगाव८५ हजार ३१२ ८० हजार ८१० ९४ टक्के 
जामनेर ९८ हजार ५४१ ८७ हजार ३७८८८ टक्के 
पाचोरा ५७ हजार ९८४ ४६ हजार ३१६ ७९ टक्के 
भडगाव ३४ हजार ७९४ २६ हजार ९१३ ७७ टक्के 

विविध पेरण्यांची अशी आहे स्थिती (हेक्टर)

पीक झालेली पेरणी सरासरी पेरणी टक्केवारी 
कापूस ४ लाख ५८१६ ५ लाख ४६९३३ ७४.२० टक्के 
सोयाबीन १८४६८ १९४९८ ९४.७२ टक्के 
उडीद ९८८७ १६१८१ ६१.७० टक्के 
मूग ९४७५ १७८६७ ५१.९१ टक्के 
तूर १२९६६ ११ हजार ९२२ १०८ टक्के 
मका १ लाख ३९१३४ ९२६५० १५० टक्के 
ज्वारी ७ हजार ८२४ २३८४ ३२.८१ टक्के 

हेही वाचा : 'लिंबू' फळबागेने दिली आयुष्याला कलाटणी; ३० गुंठ्यांमध्ये रानबा खरातांनी साधली आर्थिक प्रगती

Web Title: While cotton acreage has decreased, this district's maize acreage has seen a record increase this year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.