Lokmat Agro >शेतशिवार > तुमच्या मुलीचे लग्न व शिक्षणासाठी कुठे कराल पैशांची गुंतवणूक? 'हे' आहेत ३ पर्याय

तुमच्या मुलीचे लग्न व शिक्षणासाठी कुठे कराल पैशांची गुंतवणूक? 'हे' आहेत ३ पर्याय

where will you invest money for your daughter's marriage and education? Here are 3 options | तुमच्या मुलीचे लग्न व शिक्षणासाठी कुठे कराल पैशांची गुंतवणूक? 'हे' आहेत ३ पर्याय

तुमच्या मुलीचे लग्न व शिक्षणासाठी कुठे कराल पैशांची गुंतवणूक? 'हे' आहेत ३ पर्याय

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक १५ वर्षांमध्ये नेमका किती परतावा देईल, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे.

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक १५ वर्षांमध्ये नेमका किती परतावा देईल, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे.

शेअर :

Join us
Join usNext

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक १५ वर्षांमध्ये नेमका किती परतावा देईल, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे.

येथे पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एसआयपी या गुंतवणुकीच्या तीन पर्यायांची गणितासह तुलना केली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य निर्णय घेऊ शकता.

कमी जोखमीसाठी पीपीएफसह सुकन्या समृद्धी योजना हे चांगले पर्याय आहेत, पण जर तुम्ही थोडीशी जोखीम घेऊ शकत असाल, तर दीर्घकाळ एसआयपीमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवता येतो. लक्षात घ्या, इथे १५ वर्षासाठी गणिती तुलना केली आहे.

पीपीएफ
७.१% वार्षिक व्याजाने, तुमची एकूण गुंतवणूक १८ लाख रुपये असेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला सुमारे ३१.५५ लाख रुपये मिळतील, यात १३.५५ लाख रुपये व्याज असेल.

एसएसवाय
सुकन्या समृद्धी योजनेत ८.२% वार्षिक व्याजदराने, तुमची एकूण गुंतवणूक १८ लाख रुपये होऊन तुम्हाला सुमारे सुमारे ४७ लाख रुपये मिळतील, यात २९ लाख रुपये व्याज असेल.

एसआयपी
१२% वार्षिक परताव्याच्या अंदाजाने, १८ लाख रुपयांची गुंतवणूक १५ वर्षात सुमारे ५०.४५ लाख रुपये होऊ शकते, यात ३२.४५ लाख रुपये नफा असेल. मात्र, यात जोखीम आहे.

अधिक वाचा: मोबाइलने ई-केवायसी करा आणि 'ह्या' कार्डवर पाच लाखांचे आरोग्य कवच मिळवा

Web Title: where will you invest money for your daughter's marriage and education? Here are 3 options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.