Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > नाफेडच्या सोयाबीन खरेदीचे १.६४ कोटींचे पेमेंट केव्हा? शेतकरी आर्थिक अडचणीत

नाफेडच्या सोयाबीन खरेदीचे १.६४ कोटींचे पेमेंट केव्हा? शेतकरी आर्थिक अडचणीत

When is the payment of 1.64 crores for soybean purchase of Nafed? Farmers in financial trouble | नाफेडच्या सोयाबीन खरेदीचे १.६४ कोटींचे पेमेंट केव्हा? शेतकरी आर्थिक अडचणीत

नाफेडच्या सोयाबीन खरेदीचे १.६४ कोटींचे पेमेंट केव्हा? शेतकरी आर्थिक अडचणीत

शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांना सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांना अध्याप मिळेना सोयाबीनचे पैसे, शेतकरी अडचणीत.

शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांना सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांना अध्याप मिळेना सोयाबीनचे पैसे, शेतकरी अडचणीत.

 डीएमओ, व्हीसीएमएफच्या केंद्रांवर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३७५३ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. याबाबतचे १.६४ कोटींचे पेमेंट दीड महिन्यापासून मिळाले नसल्याने अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शेतकर्‍यांच्या शेतमालास हमीभावाचे संरक्षण मिळावे, यासाठी डीएमओद्वारा चार व व्हीसीएमएफद्वारा एका खरेदी केंद्रावर ३५७३ क्विंटल सोयाबीनची खरेदी सहा फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली. खासगी बाजारात सोयाबीनचे दर रुपये क्विंटलच्या दरम्यान असल्याने शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करीत सोयाबीनची विक्री केली. याचे १.६४ कोटी रुपयांचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.

या हंगामाच्या वेळेस शासनाने थोड्या उशिराने सोयाबीनची नोंदणी व खरेदी केली होती. वास्तविक पाहता सोयाबीनचा हंगाम सप्टेंबर महिन्याला शेवटी सुरू होतो. यावेळी हमीभाव ४६०० रुपयांपेक्षा कमी दराने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी करण्यात आली. चार महिन्यांत अडचणीतील शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यावर शासनाला जाग आली व सोयाबीनसाठी नोंदणी सुरू केली.

शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी

अशी झाली सोयाबीनची केंद्रनिहाय खरेदी

डीएमओच्या चांदूर रेल्वे केंद्रावर ४.५० क्विंटल, दर्यापूर ९९१ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर ९९४ क्विंटल, तिवसा केंद्रावर १२१७ क्विंटलची खरेदी झाली. याचे १.५४ कोटी अध्याप मिळालेले नाहीत. शिवाय व्हीसीएमएफद्वारा धामणगाव केंद्रावर २२४ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. असे एकूण १.६४ कोटीं अध्याप मिळालेले नाही.

Web Title: When is the payment of 1.64 crores for soybean purchase of Nafed? Farmers in financial trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.