बारामती : राज्य शासनाचा कृषी विभाग आता हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. बारामती तालुक्यात कृषी योजनांचा अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावनिहाय व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहे.
कृषी सहायक यांच्यामार्फत योजनांबाबत सर्वं माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहाचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याच्या सूचना कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी दिल्या आहेत.
रस्तोगी यांनी नुकतीच कृषी विभागाच्या कन्हेरी येथील तालुका फळ रोपवाटिकेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी पोखराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह तसेच कृषी आयुक्त रावसाहेब बागडे, व्यवस्थापकीय संचालक सुनील महेंद्रकर, प्रकल्प संचालक स्मार्ट कृषी उपसचिव डॉ. हेमंत वसेकर, संतोष कराड, प्रफुल्ल ठाकूर, अण्णा चंदनशिवे, प्रतिभा पाटील, एन.एच.एम, संचालक किसन मुळे, आत्माचे संचालक अशोक किरनाळी, विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नायकवडी उपस्थित होते.
तसेच प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटे, निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक सुनील बोरकर, उदय देशमुख, ठाण्याचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने, पुणे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाणी, ठाणे वि.कृ.स.स. अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, एनएचएम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पल्लवी देवरे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल आदी उपस्थित होते.
यावेळी प्रधान सचिव रस्तोगी यांनी शेतकऱ्यांपर्यंत रोप निर्मिती, रोप लागवड करणे, विविध छाटणी, निगा राखणे याबाबत प्रशिक्षण आयोजित करावे, रोपवाटिकेद्वारे दर्जेदार रोपेनिर्मिती करण्याबाबतही मार्गदर्शन केले.