Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > मजूर टंचाईवर केली मात या यंत्राच्या सहाय्याने लावतोय आम्ही भात

मजूर टंचाईवर केली मात या यंत्राच्या सहाय्याने लावतोय आम्ही भात

We are planting paddy with the help of this machine to overcome labor shortage | मजूर टंचाईवर केली मात या यंत्राच्या सहाय्याने लावतोय आम्ही भात

मजूर टंचाईवर केली मात या यंत्राच्या सहाय्याने लावतोय आम्ही भात

शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती केली आहे.

शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती केली आहे.

वैभव गायकर
पनवेल : शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारेभातशेती केली आहे.

सध्याच्या घडीला मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत असून शेती करणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी यंत्राच्या सहाय्याने भात लावणीकडे वळू लागला आहे. तळोजा मधील मधुसूदन पाटील, वैभव पाटील या शेतकऱ्यांनी यंत्रणेच्या मदतीने भात लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पनवेल तालुक्यात भातशेतीसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. बाहेरील गावातून मजूर आणून भात लागवड करणे, त्यासाठी वाहन भाडे, दिवसाची मजुरी आणि मजुरांचा थकवा दूर करण्यासाठी वेगळे खर्च करावे लागते.

त्यात बी-बियाणे, खताच्या दारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा अडचण शेतकरी व्यक्त करीत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी बहुतांश शेतकरी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करताना दिसून येत आहे.

हे आहेत फायदे
-
चिखलनी व लागवड करावी लागत नाही.
- लागवड खर्चात पूर्णपणे बचत ट्रॅक्टरवर होणारा खर्च वाचतो
- शेतमजूर, मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागत नाही.
- हवामान बदलाचा पिकावर कमी प्रमाणात प्रभाव पडतो.
अधिक नफा प्राप्त होतो.

शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे. नजीकच्या काळात भात लागवडीसाठी लागणारे परवडेनासे झाले आहेत. मजुरी, वाहन भाडे आणि इतरही खर्च करावे लागत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी या वर्षी टोचण यंत्राद्वारे भात लागवड केली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली आहे. तळोजा परिसरात हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे शेतकरी कौतुक करीत आहे. - मधुसूदन पाटील, प्रगतशील शेतकरी, तळोजा

Web Title: We are planting paddy with the help of this machine to overcome labor shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.