इराण-अमेरिका-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील तणावामुळे, महाराष्ट्र आणि भारतात एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अशा स्थितीत गॅस बचतीसाठी आपण काय करू शकतो. स्वयंपाक करताना थोड्या चांगल्या सवयी लावल्या तर गॅसची २०-३०% पर्यंत बचत होऊ शकते. यासाठी खाली काही सोपे आणि उपयुक्त उपाय दिले आहेत.
घरगुती गॅस बचतीचे १५ प्रभावी उपाय१) प्रेशर कुकरचा जास्त वापर कराडाळ, भात, बटाटे, कडधान्ये प्रेशर कुकरमध्ये लवकर शिजतात आणि गॅस कमी लागतो.
२) भांड्यावर झाकण ठेवाझाकण ठेवल्यास उष्णता टिकून राहते व अन्न लवकर शिजते.
३) कडधान्ये आधी भिजवातूर, हरभरा, चणे, राजमा ३-४ तास भिजवले तर शिजायला कमी वेळ लागतो.
४) स्वयंपाकाची पूर्वतयारी कराभाज्या कापणे, मसाले तयार ठेवणे आधीच केल्यास गॅस वाया जात नाही.
५) योग्य आकाराचे भांडे वापरामोठ्या बर्नरवर खूप लहान भांडे ठेवू नये.
६) ज्वाळा मध्यम ठेवाजास्त मोठी ज्वाळा ठेवल्यास गॅस जास्त खर्च होतो.
७) बर्नर स्वच्छ ठेवाबर्नरमध्ये अडथळा असल्यास गॅस पूर्ण जळत नाही.
८) सपाट तळाचे भांडे वापरासपाट तळ असलेली भांडी उष्णता समान पसरवतात.
९) आवश्यक तेवढेच पाणी वापराजास्त पाणी टाकल्यास उकळायला जास्त वेळ लागतो.
१०) फ्रिजमधील पदार्थ आधी बाहेर काढाथंड पदार्थ थेट गॅसवर ठेवल्यास जास्त वेळ लागतो.
११) एकावेळी जास्त पदार्थ तयार कराएकाच वेळी २-३ पदार्थ शिजवल्यास गॅसची बचत होते.
१२) लहान बर्नर योग्य कामासाठी वापराचहा किंवा दूध गरम करताना लहान बर्नर वापरा.
१३) वाफेचा वापर कराभाज्या वाफेवर शिजवल्यास गॅस कमी लागतो.
१४) कुकरमधील उष्णता वापराकुकर बंद केल्यानंतर उरलेली उष्णता अन्न शिजवण्यास मदत करते.
१५) गॅस गळती तपासागॅस पाइप व रेग्युलेटर वेळोवेळी तपासल्यास गॅस वाया जाणे टळते.
अधिक वाचा: तुम्ही जारचे थंड पाणी पिताय? सावधान! वाचा जारच्या पाण्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी
Web Summary : Amidst global tensions, learn gas-saving tips for your kitchen. Use pressure cookers, cover pots, soak pulses, plan ahead, and maintain your burner for up to 30% savings. Small changes make a big difference.
Web Summary : वैश्विक तनाव के बीच, अपनी रसोई के लिए गैस बचाने के उपाय जानें। प्रेशर कुकर का उपयोग करें, बर्तन ढकें, दालें भिगोएँ, पहले से योजना बनाएँ और 30% तक बचत के लिए अपने बर्नर को बनाए रखें। छोटे बदलाव बड़ा अंतर लाते हैं।