छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या ६ लाख ४४ हजार ६४९ शेतकऱ्यांना व २ ते ३ हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या एकूण ४१ हजार १३९ पैकी ५ लाख ७ हजार ७८० शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड नाही. ॲग्रिस्टॅक व फार्मर आयडी असलेल्या ३ लाख ७१ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे.
१ लाख २४ हजार ८०२ शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅक व फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम जमा होईल, त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक किंवा फार्मर आयडीसाठी केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
जिल्ह्यात राज्य सरकारने मदत जाहीर केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या, पिकांचा चिखल झाला. अतिवृष्टीबाधित सहा लाख ४४ हजार ६४९ पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थेट खात्यात जमा करण्याचेही आश्वासन दिले. मात्र, केवायसी नसल्याने सव्वालाख शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.
